मुंबई - Tamannaah Bhatia Vijay Varma :अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया यांनी त्यांचे नाते अधिकृत केले नसून दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. नुकतेच हे जोडपे एका चित्रपटगृहांच्या हॉलमधून बाहेर पडताना दिसले. पापाराझींना पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले. दोघेही मंगळवारी रात्री ‘क्रू’ चित्रपट पाहायला गेले होते. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी जेव्हा एकमेकांना डेट करायला सुरुवात केली, तेव्हा अनेकाजण चकीत झाले होते. आता या दोघांची जोडी अनेकांना आवडते. नुकताच सोशल मीडियावर पापाराझीनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तमन्ना आणि विजय एकत्र चित्रपटगृहांच्या बाहेर येत आहेत.
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया व्हिडिओ व्हायरल : या क्लिपमध्ये, पापाराझी दूरवरून कॅमेरे घेऊन जोडप्याच्या दिशेने धावत आहेत. यानंतर तमन्ना आणि विजय हातात हात घालून फोटोसाठी पोझ देत होते. यावेळी तमन्नानं काळ्या टॉपसह मॅचिंग ट्राउझर्स परिधान केला होता. याशिवाय तिनं सुंदर अशी कॅप घातली होती. तसेच विजय वर्मानं बेज ग्राफिक टी-शर्टसह काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. यावर तो देखणा दिसत होता. आता या जोडप्याचा व्हिडिओ अनेक चाहत्यांना आवडत आहे. याशिवाय काहीजण विजयला तो खूप भाग्यवान असल्याचं म्हणत आहेत. विजय आणि तमन्ना अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.