मुंबई - Illegal IPL Streaming Case : अवैध इंडियन प्रीमियर लीग स्ट्रीमिंग प्रकरणी तमन्ना भाटियाला 25 एप्रिल रोजी समन्स बजावण्यात आला आहे. महादेव ऑनलाइन गेमिंग ॲपशी संबंधित एका कथित ॲपच्या जाहिरातीप्रकरणी तिला महाराष्ट्र सायबर सेलनं समन्स बजावल्यानंतर ती आता अडचणीत सापडली आहे. आज तिला 29 एप्रिल रोजी या प्रकरणी सायबर सेलच्या कार्यलयात हजर राहायचे होते. या प्रकरणी प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांची चौकशी करण्यात आली आहे. याशिवाय या प्रकरणी साहिल खानला अटक करण्यात आली असून तो 1 मेपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे.
बेकायदेशीर IPL स्ट्रीमिंग प्रकरण : फेअरप्ले हे बेटिंग एक्सचेंज प्लॅटफॉर्म आहे. या ॲपद्वारे क्रिकेट आणि बाकी इतर काही खेळांवर बेटिंग लावली जाते. 2023मध्ये या ॲपवर आयपीएलचे सामने दाखवण्यात आले होते. आपीएलचा स्टीमिंग अधिकार वायकॉम 18कडे होते. या कंपनीनं याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. यामुळे वायकॉम 18 समूहाला 100 कोटी रुपयांचं नुकसान झाल असल्याचं समजत आहे. याच प्रकरणी अभिनेता संजय दत्तला देखील 23 एप्रिलला समन्स बजवण्यात आलं होता, यानंतर त्यानं भारतात नसल्यानं सांगिलतं आणि चौकशीसाठी वेळ मागितला. रिपोर्टनुसार तमन्ना भाटियानं या ॲपसाठी जाहिरात केली होती.