महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 10:50 AM IST

ETV Bharat / entertainment

'हीरामंडी : द डायमंड बाजार' फेम ताहा शाह बदुशा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा चालवणार वारसा - Taha Shah Badussha

Taha shah :'हीरामंडी : द डायमंड बाजार' या वेब सीरीजमधील प्रमुख भूमिकेत असलेल्या ताहा शाह बदुशानं एका मुलाखतीत सुशांत सिंह राजपूतबद्दल विधान केलंय. आता सुशांतची तुलना चाहते ताहाबरोबर करताना दिसत आहेत.

Taha shah
ताहा शाह (Taha shah - Instagram)

मुंबई- Taha shah : 'हीरामंडी : द डायमंड बाजार' रिलीज झाल्यानंतर या वेब सीरीजमधील सर्व स्टार्स आता चर्चेत आले आहेत. 'हिरामंडी'चं आलिशान सेट, सुंदर वेशभूषा आणि जबरदस्त संगीतानं प्रेक्षकांना आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आता या वेब सीरीजचे यश पाहून अलीकडेच संजय लीला भंन्साळी आणि नेटफ्लिक्सनं 'हीरामंडी 2'ची घोषणा केली आहे. दरम्यान संजय लीला भन्साळीच्या 'हीरामंडी'मधील ताहा शाह बदुशाला त्याच्या अभिनयामुळे एक नवीन ओळख मिळाली आहे. 'हीरामंडी'मध्ये भूमिका मिळविण्याचा प्रवास ताहा शाहसाठी हा सोपा नव्हता. ताहानं यशराज फिल्म्सच्या 'लव्ह का द एंड'मधून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तो श्रद्धा कपूरबरोबर दिसला होता.

ताहा शाह बदुशानं केला खुलासा : मात्र त्याला या चित्रपटातून पाहिजे तशी ओळख मिळू शकली नाही. या चित्रपटानंतर त्याला इंडस्ट्रीत अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. अलीकडेच, एका संभाषणात ताहानं खुलासा केला की, हिरामंडीच्या यशानंतर, त्याला चाहत्यांकडून सतत संदेश येत आहेत. अनेकांनी त्यांची तुलना दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर केली आहे. ताहानं सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना म्हटलं, "मी सुशांतला वैयक्तिकरित्या ओळखत होतो. मला माहित आहे की इंडस्ट्रीतून बाहेर पडल्यानंतर कसं वाटतं. सुशांतचा वारसा मला पुढे न्यायचा आहे. खरं तर, लोकांनी मला मेसेज केला की मी त्यांचा नवीन सुशांत आहे, हे आश्चर्यकारक आहे. कारण त्याला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलंय. मला फक्त या अपेक्षा पूर्ण करण्याची आशा आहे."

ताहाची तुलना सुशांतशी झाली : सुशांत सिंह राजपूतबरोबरच्या भेटीबद्दल बोलताना ताहा म्हटलं,- 'तो खूप तत्वज्ञानी आणि बुद्धिमान व्यक्ती होता. तो पुस्तकांबद्दल खूप बोलत असे, त्यामुळे मला तो खूप जवळचा वाटू लागला होता. मी त्याच्याबरोबर जास्त वेळ घालवला नाही. आम्ही फक्त कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये बोलायचो. आम्ही जेव्हा कधी भेटायचो तेव्हा नासाबद्दल बोलायचो. याशिवाय 'काई पो चे' या चित्रपटाबद्दल देखील आम्ही बोललो होतो. कारण याआधी मला अमित साधनं साकारलेल्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं, पण वयाच्या फरकामुळे मला ही भूमिका मिळू शकली नाही. गेल्या महिन्यात ताहा शाह बदुशानं कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्येही हजेरी लावली होती. ताहानं याआधीही आपल्या संघर्षाबद्दल उघडपणे सांगितलं आहे. 'हिरामंडी'मुळे त्याचे नशीब कसे बदलले याबद्दल देखील त्यानं सांगितलं आहे.

हेही वाचा :

  1. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये सानिया मिर्झानं केला 'प्रेमाच्या शोधात' असल्याचा खुलासा - Sania Mirza
  2. अर्जुन रामपालनं रचला इतिहास, 'चाइल्ड रिलीफ अ‍ॅन्ड यू' अमेरिकेसाठी 1.5 डॉलर दशलक्ष केलं जमा - arjun rampal
  3. वरुण धवन आणि नताशा दलाल यांना कन्यारत्नाची प्राप्ती - Varun Dhawan And Natasha Dalal

ABOUT THE AUTHOR

...view details