मुंबई - Sushmita Sen Reveals Wedding Plans : सुष्मिता सेनवर 'आर्या' मालिकेच्या तिसऱ्या भागात साकारलेल्या कठोर भूमिकेसह प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्यामुळे चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी ती अभिनेता रोहमन शॉलशी असलेल्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत असते. अलिकडेच तिने आपल्या लग्नाबद्दलही भाष्य केलं आहे. आत्तापर्यंत सेटल होण्याचा कोणताही विचार ती करत नव्हती. मात्र, आता ती लग्न व्यवस्थेवर विश्वास बाळगणारी व्यक्ती आहे.
लग्नाबद्दलचा विचार बोलून दाखवताना सुष्मिता सेन म्हणाली, "मला माहित आहे की उर्वरित जगाला वाटते की, किमान काही काळासाठी मी सेटल होण्याची काळजी घेतली पाहिजे. मला त्याची पर्वा नाही. हे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मी विवाह व्यवस्थेवर विश्वास ठेवते आणि आदरही करत असल्यामुळे मी हा विचार करतेय हे महत्त्वाचे आहे. मला राम माधवानी आणि निर्माती अमिता माधवानींसारख्या काही लोकांना ओळखते जे खूपच छान कपल आहेत. पण मी सहवास, दोस्तीवर मोठा विश्वास ठेवते आणि जर हे अस्तित्वात असेल तर या गोष्टी घडू शकतात. पण तो आदर आणि दोस्ती खूप महत्त्वाची आहे आणि स्वातंत्र्य, खूप महत्वाचे आहे."
सुष्मिता सुरुवातीला मॉडेल रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्याला ती 2018 मध्ये इंस्टाग्रामवर भेटली होती, परंतु 2021 मध्ये ते वेगळे झाले. "आम्ही मित्र म्हणून सुरुवात केली, आम्ही मित्रच राहिलो! हे नाते फार काळानंतर संपले... प्रेम कायम आहे," असे ती तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ब्रेकअपची घोषणा करत लिहिले होते. लक्षाधीश ललित मोदींसोबत काही काळ कथित अफेअर झाल्यानंतर सुष्मिताने रोहमनशी पुन्हा जुळवून घेतले. त्यांच्या पॅच-अपनंतर दोघेही काही कार्यक्रमात हात धरून लग्नाच्या अफवांना उत्तेजन देताना दिसले. तथापि, सुष्मिताने आता नजीकच्या काळात तातडीने लग्नाच्या विचाराबद्दल नकार दिला.
दरम्यान, सुष्मिताने अलीकडेच 'आर्या' मधील तिच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले. शोमध्ये, ती एका आक्रमक आईच्या भूमिकेत दिसली होती. गुन्हेगारीच्या जगापासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी खूप प्रयत्न करणाऱ्या आईची भूमिका तिने साकारली होती. पहिल्या सीझनला इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्समध्ये 'सर्वोत्कृष्ट ड्रामा' मालिकेसाठी नामांकन मिळाले होते. आर्या मालिकेचा तिसरा सिझन आता डिस्ने+ हॉटस्टार वर शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी उपलब्ध होईल. राम माधवानी दिग्दर्शित ही मालिका त्याची पत्नी अमिताने बनवली आहे आणि त्यात इला अरुण आणि सिकंदर खेर यांसारखे कलाकार आहेत.
हेही वाचा -
- किरण रावनं आमिर खानच्या समर्थनार्थ केली संदीप रेड्डी वंगावर कमेंट, 'अॅनिमल' टीमने दिलं प्रत्युत्तर
- 'लव्ह स्टोरीयाँ': करण जोहरने बनवली व्हॅलेंटाईन डेसाठी सहा भागांची मालिका
- विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरच्या आगामी 'द फॅमिली स्टार'च्या पहिल्या गाण्याची झलक