मुंबई - Sushant Singh Rajput Sister : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानं संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. 14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या वांद्रे अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. त्यानं आत्महत्या केल्याचं बातम्यामध्ये दाखविण्यात आलं होतं. मात्र, यानंतर देखील प्रकरणाची आणखी चौकशी सुरू करण्यात आली. आतापर्यत सुशांत केस प्रकरणी कुठलीही अपेडट आली नाही. दरम्यान सुशांत सिंग राजपूतची बहिणी श्वेता सिंह किर्तीनं पीएम मोदींकडे न्यायासाठी आवाहन केलं आहे.
सुशांत सिंहची बहिणनं पीएम मोदींकडे केली विनंती: सुशांतच्या मृत्यूमुळे हिंदी चित्रपटसृष्टी पूर्णपणे लोकांच्या नजरेतून खाली गेलं होतं आणि सुशांतच्या चाहत्यांनी सर्व स्टार्सवर नेपोटिझमचे आरोप करत त्यांना निशाणावर धरले होते. सुशांत सिंह जाऊन 45 महिने झाले आहेत, मात्र आतापर्यत सुशांत आणि त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. गेल्या 4 वर्षांपासून सुशांतचे कुटुंब न्यायासाठी इकडून तिकडे भटकत आहे. श्वेता सिंह किर्तीनं शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझ्या भावाचे निधन होऊन 45 महिने झाले आहेत आणि आम्ही अजूनही उत्तर शोधत आहोत, पीएम मोदीजी कृपया आम्हाला मदत करा आणि सीबीआय तपास कुठपर्यत पोहोचला आहे ते शोधा. आम्हाला सुशांतला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यायचा आहे.''