महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

मुंबईत सूर्या शिवकुमार स्टारर 'कांगुवा' चित्रपटाचं झालं प्रमोशन, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल - KANGUV MOVIE PROMOTION IN MUMBAI

'कांगुवा' चित्रपटाचं प्रमोशन मुंबईत करण्यात आलं आहे. या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेता सूर्या शिवकुमार आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

suriya sivakumar
सूर्या शिवकुमार ('कांगुवा' - (@studiogreen_official Instagram))

By

Published : Oct 17, 2024, 5:02 PM IST

मुंबई : साउथ फिल्म इंडस्ट्रीतील 'सिंघम' सूर्या शिवकुमारनं त्याचा आगामी चित्रपट 'कांगुवा'च्या प्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'कांगुवा'चं प्रमोशन सुरू केलं आहे. त्याची सुरुवात आता त्यांनी मुंबईमधून केली आहे. अलीकडेच निर्मात्यांनी सोशल मीडियावर प्रमोशनची एक झलक शेअर केली आहे. त्याचबरोबर सूर्याचे न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गुरुवारी 'कांगुवा'च्या निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर चित्रपटाचा प्रमोशन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर यावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत संपूर्ण सभागृह खचाखच भरलेले दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत सूर्य शिवकुमार सभागृहात दाखल होताच, संपूर्ण सभागृह त्याच्या नावाने गुंजले.

'कांगुवा' चित्रपटाचं प्रमोशन सुरू : यावेळी सूर्य शिवकुमारबरोबर सेल्फी घेण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. हा व्हिडिओ शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'कांगुवाच्या प्रमोशनची चांगली सुरुवात, पिंक व्हिला इव्हेंट, मुंबई येथे आमच्या 'कांगुवा' उर्फ ​​फ्रान्सिसची झलक पाहा.' चाहत्यांनी प्रमोशनमधील सूर्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या कार्यक्रमात सूर्या आणि बॉबी देओल यांनी 'कांगुवा'च्या प्रमोशनसाठी हजेरी लावली, जिथे दोघांनी पत्रकार आणि प्रेक्षकांची भेट घेतली. याशिवाय त्यांनी पत्रकार आणि प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील यावेळी दिली. या कार्यक्रमात सूर्या साऊथ सुपरस्टार अजितबद्दल बोलताना दिसला.

'कांगुवा' चित्रपटाबद्दल : 'कांगुवा' चित्रपटाचा ऑडिओ लॉन्च 26 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात साऊथ अभिनेता रजनीकांत आणि प्रभास उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आगामी चित्रपट 'कांगुवा' 14 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. या चित्रपटात ॲक्शन आणि ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'कांगुवा' चित्रपटामध्ये सूर्या मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवा यांनी केलंय. 'कांगुवा'मध्ये बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून दिशा पटानी लिडींग लेडीच्या भूमिकेत असणार आहे. आता चाहते या चित्रपटाच्या रिलीजची वाट आतुरतेनं पाहात आहेत.

हेही वाचा :

  1. सूर्या आणि बॉबी देओल स्टारर 'कांगुवा'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - kanguva trailer released
  2. 'कांगुवा'मधील 'फायर' गाणं अखेर सूर्याच्या वाढदिवसानिमित्त रिलीज, पाहा व्हिडिओ - Kanguva movie
  3. 'कांगुवा' तामिळ चित्रपट जगभरात 38 भाषांमध्ये होणार प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details