मुंबई - The Great Indian Kapil Show : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा कॉमेडी शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या नव्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. आता या आगमी एपिसोडमध्ये बॉलिवूडमधील देओल ब्रदर्स सनी आणि बॉबी देओल हजेरी लावणार आहेत. शोचा प्रोमो अप्रतिम असून देओल ब्रदर्स कपिलबरोबर धमाल करताना दिसत आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'नं नुकतेच त्याचे चार यशस्वी आठवडे साजरे केले आहेत. याशिवाय शोमध्ये सनी आणि बॉबीच्या एंट्रीनं आता अनेकांना खुश केलं आहेत, कारण 'अॅनिमल' आणि 'गदर 2' चित्रपटांपासून बॉबी आणि सनीच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे.
सनी आणि बॉबी भावूक :शोच्या प्रोमोची सुरुवात खूपच धमाकेदार आहे. या प्रोमोत सनी देओल असं म्हणताना दिसतो की, "आम्ही 1960 पासून प्रसिद्धीच्या झोतात आहोत, 23 वर्षांपासून आम्ही खूप प्रयत्न करत होतो मात्र काही चांगलं होत नव्हतं. त्यानंतर माझ्या मुलाचे लग्न झालं. 'गदर 2' रिलीज झाला आणि त्याआधी माझ्या वडिलांचा चित्रपट आला. नंतर 'अॅनिमल' आला. हा चित्रपट आश्चर्यकारक होता." मोठ्या भावाचे हे शब्द ऐकून बॉबीच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो भावनातिरेगाने म्हणाला की, "जर माझ्या खऱ्या आयुष्यात कोणी सुपरमॅन असेल तर तो माझा भाऊ आहे." एरवी हास्यकल्लोळात बुडालेल्या या शो मध्ये या संवादांमुळे वातावरणात हळवेपणा आाला.