मुंबई - Border 2 Release Date : बॉलिवूडचा 'तारा सिंह' सनी देओलनं 13 जून रोजी त्याच्या 'बॉर्डर 2' चित्रपटाची घोषणा केली होती आणि सांगितले होतं की, 27 वर्षांनंतर तो त्याचं दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी येत आहे. 'बॉर्डर 2' ची घोषणा त्यानं केल्यानंतरच्या बातमीनं संपूर्ण देशातील चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं होतं. विशेष म्हणजे 13 जून 1997 रोजी रिलीज झालेल्या 'बॉर्डर' चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणाही 13 जूनलाच झाली होती. आज 'बॉर्डर 2' च्या संदर्भात आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. आज 14 जूनला 'बॉर्डर 2' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. सनीच्या चाहत्यांना या चित्रपटासाठी बराच काळ वाट पाहावी लागणार असून या खास प्रसंगी हा चित्रपट २०२६ साली प्रदर्शित होणार आहे.
'बॉर्डर २' हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
सनी देओलच्या चाहत्यांना 'बॉर्डर 2' या चित्रपटासाठी बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण चित्रपटाचं चित्रीकरण अद्याप सुरू झालेलं नाही आणि 'बॉर्डर 2' ची घोषणा झाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक जेपी दत्ता यांनी चित्रपटातील फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांना उत्तेजित करण्यासाठी बॉर्डरच्या सेटचे फोटो टाकण्यात आले आहेत. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे, 23 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त 'बॉर्डर 2' प्रदर्शित होणार आहे.
याआधी सनी देओल 'लाहोर 1947' आणि 'सफर' या चित्रपटात दिसणार आहे. दोन्ही चित्रपटांचे शूटिंग सुरू झाले असून सनी देओलच्या या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख केव्हाही जाहीर होऊ शकते.