महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सनी देओल आणि अमिषा पटेल अभिनीत 'गदर 2' पुन्हा एकदा होईल रिलीज - Gadar 2 - GADAR 2

Gadar 2 Re Release : 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपट 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. आता निर्मात्यांनी एका ट्विस्टसह पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Gadar 2 Re Release
गदर २ रि -रिलीज (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 4:42 PM IST

मुंबई - Gadar2 Re release :अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर 'गदर 2' हा चित्रपट 2023 च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खूप झपाट्यानं कमाई करून इतिहास रचला होता. आता वर्षभरानंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांसाठी एक नवीन अपडेट आणली आहे. 'गदर 2'चे निर्माते चित्रपटाला 1 वर्ष पूर्ण होत असल्यानं, हा चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित करणार आहे. यावेळी मूकबधिर प्रेक्षकांसाठी हा चित्रपट सांकेतिक भाषेत चित्रपट असणार आहे. 'गदर'च्या सुपरहिट सीक्वेलनं गेल्या वर्षी देशभरातील लाखो लोकांची मनं जिंकली होती. 'गदर 2' हा चित्रपट 4 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.

'गदर 2' चित्रपटाबद्दल :सनी देओलची, तारा सिंगमधील ही भूमिका खूप लोकप्रिय झाली आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना सनीनं म्हटलं, "गदर 2चं माझ्या मनात एक विशेष स्थान आहे. रिलीज होऊन एक आता वर्ष होणार आहे, तरीही प्रेक्षकांकडून आम्हाला प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे. हे पाहून मला खूप छान वाटलं. यावेळी भारतीय सांकेतिक भाषेत पुन्हा रिलीज झाल्यानं हा चित्रपट आणखी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करेल. मला आशा आहे की, लोकांनी वर्षभरापूर्वी जेवढे प्रेम दिले होते, तेवढेच प्रेमही याला देईल." सकीनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमिषा पटेलनं देखील एका संवादादरम्यान म्हटलं, "गदर आणि गदर 2 चा भाग बनणे हा माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता. सकीना आणि तारा सिंगची कहाणी प्रेक्षकांसाठी पुन्हा मोठ्या पडद्यावर आणणे खूप छान आहे. मला आशा आहे की हा उपक्रम इतर चित्रपट निर्मात्यांना सर्व वर्गांतील प्रेक्षकांसाठी मनोरंजक बनवण्यासाठी प्रेरणा देईल."

'गदर 2'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई : 1971 च्या भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर, या चित्रपटात तारा सिंग (सनी देओल)चं धैर्य दाखवलं गेलं आहे. तो आपला मुलगा चरणजीत (उत्कर्ष शर्मा) याला वाचवण्यासाठी सर्व अडचणींना तोंड देत सीमा ओलांडतो. या चित्रपटाची कहाणी खूप दमदार आहे. 'गदर 2' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 691.08 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट 60 कोटीच्या बजेटमध्ये निर्मित करण्यात आला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं होतं.

हेही वाचा :

  1. 'गदर 2' दिग्दर्शक अनिल शर्मानं 'पुष्पा 2' आणि अल्लू अर्जुनचं केलं कौतुक, पाहा पोस्ट - Allu Arjun
  2. OMG 2 and Gadar 2 : 'ओमएजी 2' आणि 'गदर 2' लवकरच होणार ओटीटीवर प्रदर्शित ; जाणून घ्या डेट...
  3. Gadar 2 and omg 2 box office collection day 25 : 'गदर 2'ने 500 कोटीचा टप्पा केला पार ; 'ओएमजी 2'च्या कमाईत झाली घसरण...

ABOUT THE AUTHOR

...view details