महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित - STREE 2 TRAILER - STREE 2 TRAILER

Stree 2 Trailer : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2'चं ट्रेलर दोन दिवसांनी रिलीज होणार आहे. या चित्रपटामधील 2 नवीन पोस्टर आता समोर आले आहेत.

Stree 2 Trailer
स्त्री 2 ट्रेलर ('स्त्री 2' पोस्टर (IMAGE- ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 1:17 PM IST

मुंबई - Stree 2 Trailer :अमर कौशिकच्या 2018 च्या ब्लॉकबस्टर 'स्त्री'चा सीक्वेल यंदाच्या स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार आहे. रिलीजच्या एक महिना आधी निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख जाहीर केली आहे. 'स्त्री 2' मध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. 'स्त्री 2'मधील स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटामध्ये वरुण धवन, तमन्ना भाटिया, पंकज त्रिपाठी,अपारशक्ति खुराना, विजय राज, अभिषेक बॅनर्जी, आकाश दाभाडे, फ्लोरा सैनी आणि इतर काही कलाकार दिसणार आहेत. मंगळवारी 16 जुलै रोजी श्रद्धा कपूरनं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर 'स्त्री 2' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचे 2 नवीन पोस्टर पोस्ट केले आहेत.

श्रद्धा कपूरनं शेअर केलं 'स्त्री 2'मधील पोस्टर : याशिवाय तिनं चित्रपटाच्या ट्रेलरचे अपडेट्सही शेअर केली आहेत. दरम्यान शेअर केलेल्या पहिल्या पोस्टरमध्ये एक स्त्री आहे, जी हातात वेणी पकडून आहे. याशिवाय या पोस्टरमध्ये एक भितीदायक आकृती देखील दिसत आहे. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, "स्त्री येत आहे , फक्त 2 दिवसात!." श्रद्धा कपूरनं आणखी एक नवीन पोस्टर पोस्ट केलंय, यामध्ये देखील एक महिला वेणी हातात घेऊन उभी असलेली दिसत आहे. या पोस्टमध्ये एक भितीदायक आकृती दिसत आहे. तसेच पोस्टरमध्ये सरकटे यांची दहशत असं लिहिलं आहे. हे लेटेस्ट पोस्टर शेअर करताना श्रध्दानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "जेव्हा चंदेरीवर दहशत माजली, तेव्हा सगळ्यांना एकच नारा आठवला, ओ स्त्री रक्षा करो." या चित्रपटाचा ट्रेलर हा 18 जुलै रोजी रिलीज होणार आहे.

कधी होईल 'स्त्री 2' रिलीज : यापूर्वी अशी बातमी होती की, अक्षय कुमार हा श्रद्धा कपूर आणि राजकुमार स्टारर 'स्त्री 2'चित्रपटात एन्ट्री करणार आहे. या चित्रपटात तो कॅमिओ करताना दिसणार आहे. 'स्त्री 2' रिलीजच्या दिवशी अक्षय कुमारचा 'खेल-खेल' चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हे दोन्ही चित्रपट 15 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. आता अनेकांना 'स्त्री 2'बद्दल उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाची निर्मिती मॅडॉक फिल्म्स, जिओ प्लॅटफॉर्म्स करत आहे.

हेही वाचा :

  1. कमल हासन, मामूट्टी, मोहनलाल, फहद फासिलसह दिग्गज प्रतिभावंतांचा 'मनोरथंगल' ट्रेलर रिलीज - Manorathangal Trailer
  2. कार्तिक आर्यन स्टारर 'चंदू चॅम्पियन' 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होईल प्रदर्शित - KARTIK AARYAN
  3. 'शीला की जवानी' ते 'काला चष्मा'पर्यंत प्रत्येक गाण्यावर बेभान नृत्य करणाऱ्या कतरिना कैफचा वाढदिवस - Katrina Kaif Birthday

ABOUT THE AUTHOR

...view details