मुंबई - SS Rajamouli in Kalki 2898 AD : देशातील आणि जगभरातील सिनेप्रेमींमध्ये 'कल्की 2898 एडी'ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. साऊथ सेलेब्स देखील हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर आहेत. दरम्यान सोशल मीडियावर बाहुबली आणि आरआरआर सारख्या मेगा ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक एस एस. राजामौली यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये असा दावा केला जात आहे की ते 'कल्की 2898 एडी' चित्रपट पाहण्यासाठी थिएटरच्या बाहेर स्पॉट झाले होते. दरम्यान आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि साऊथ सिनेसृष्टीतील पॉवर स्टार पवन कल्याण यांचा मुलगा 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचला.
राजामौली झाले थिएटरमध्ये स्पॉट : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत, राजामौली 'कल्की 2898 एडी'चा मॉर्निंग शो पाहण्यासाठी आले असल्याचं दिसले. या फोटोत थिएटरच्या बाहेर राजामौली हे कंबरेवर हात ठेवून उभे आहेत. राजामौली यांच्याबरोबर ऑस्कर विजेते संगीत दिग्दर्शक एमएम किरवाणीही आहेत. राजामौली यांच्या पत्नी रमा राजामौलीही फोटोत दिसत आहे. हा फोटो हैदराबादमधील कोणत्या थिएटरचे आहे याची पुष्टी झालेली नाही. 'कल्की 2898 एडी' आज 27 जून रोजी म्हणजेच आजच रिलीज झाला आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी 100 कोटीची कमाई करू शकतो, असा अंदाज प्रभासचे चाहते करत आहेत.