महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

एसएस राजामौली यांनी 'पुष्पा 2'च्या ट्रेलरचं केलं कौतुक, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी अल्लू अर्जुनला केली पार्टीची मागणी - SS RAJAMOULI

बाहुबली दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी अल्लू अर्जुनच्या आगामी 'पुष्पा 2' या चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले.

एसएस राजामौली यांनी
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 18, 2024, 4:17 PM IST

मुंबई :अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'चा ट्रेलर 17 नोव्हेंबर रोजी पाटण्यात रिलीज झाला. आता ट्रेलर अनेकांना आवडला आहे. चित्रपटसृष्टीसह सर्वच स्तरातून अल्लू अर्जुनचे कौतुक केले जात आहे. अलीकडे,' बाहुबली' आणि 'आरआरआर' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी 'पुष्पा 2'च्या ट्रेलरचे कौतुक केले आहे. आता त्यांनी सोशल मीडियावर ट्रेलरबद्दल ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अल्लू अर्जुनसमोर पार्टीची मागणी केली आहे. एसएस राजमौल यांनी ट्विटरवर ट्विट करत लिहिलं, 'जंगलीची आग पाटणा येथून सुरू झाली आहे आणि ती देशभर पसरत आहे. 5 डिसेंबरला स्फोट होणार आहे. पुष्पा पार्टीची वाट पाहू शकत नाही.'

एसएस राजमौलनं केलं अल्लू अर्जुनचं कौतुक : राजामौली यांच्यासह संपूर्ण चित्रपटसृष्टीतून अल्लू अर्जुनवर अनेकजण आता अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. विजय देवरकोंडा, डेव्हिड वॉर्नर यांसारख्या सेलिब्रिटींनीही त्याला सोशल मीडियाच्या माध्यामातून शुभेच्छा दिल्या आहेत. अल्लू अर्जुनचे चाहते देखील ट्रेलर पाहून खूप आनंदी आहेत आणि चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत. दरम्यान रिपोर्ट्सनुसार 'पुष्पा 2', चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक मोठ्या शहरांची निवड करण्यात आली आहे. या शहरांची नावे आहेत- पाटणा, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, मुंबई, बंगलोर आणि कोची ही आहेत. सुरुवात 17 नोव्हेंबरपासून पाटणा येथून झाली आहे.

'पुष्पा 2'ची स्टार कास्ट :अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत, तर साऊथ अभिनेत्री श्रीलीलानं यात खास डान्स नंबर केला आहे. आता 'पुष्पा 2'च्या निर्मात्यांनी यूएसए प्रीमियर प्री सेलमध्ये खळबळ उडवून दिली आहे. याविषयी नुकतीच निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये निर्मात्यांनी लिहिलं की, 'कोणतेही रेकॉर्ड असणार नाही, जेव्हा तो राज्य करेल. द ब्रँड - पुष्पराज.' दरम्यान' पुष्पा 2'नं 825 हजारांहून अधिक यूएसए प्रीमियर प्री-सेल्ससह 30 हजारांहून अधिक तिकिटे विकली आहेत. यासह हा चित्रपट लवकरच यूएसए प्रीसेलमध्ये 1 दशलक्षचा टप्पा पार करणार आहे.

हेही वाचा :

  1. 'पुष्पा 2'चा ट्रेलर पाहून चाहते रिलीजसाठी आतुर, अल्लू अर्जुन मोठ्या पडद्यावर 'वाइल्ड फायर'च्या रुपात करेल धमाका...
  2. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना 'पुष्पा 2: द रुल'च्या ट्रेलर लॉन्चसाठी पाटण्याला हजर
  3. 'पुष्पा 2'मध्ये श्रीलीलाची अधिकृत एंट्री, पोस्टर रिलीज करून निर्मात्यांनी दिला चाहत्यांना सुखद धक्का...

ABOUT THE AUTHOR

...view details