मुंबई - Jawan in Japan : शाहरुख खान अभिनित 'जवान' चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्यावर्षी हा चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक होता. हा चित्रपट फक्त भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. जगभरात रिलीज झाल्यानंतर जवळजवळ एक वर्षानंतर, 'जवान'नं जपानमध्ये रिलीजची तारीख निश्चित केली आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस जपानमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आज, 3 जुलै रोजी शाहरुख खानच्या एका चाहत्यानं त्याच्या अधिकृत अकाऊंटवर 'जवान'चे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर जपानी भाषेतील आहे. या पोस्टरद्वारे असे सांगण्यात आले आहे की, 'जपान'मध्ये 'जवान'चं आगाऊ बुकिंग 5 जुलैपासून सुरू होईल.
'जवान' चित्रपट होईल जपानमध्ये रिलीज : 'जवान' या चित्रपटाचं दिग्दर्शनं साऊथ दिग्दर्शक ॲटलीनं केलय. शाहरुख खानचा हा चित्रपट अनेकांना पसंत पडला होता. शाहरुखची जपानमध्ये देखील फॅन फॉलोईंग खूप आहे. सध्या जपानमधील चाहते या चित्रपटाच्या रिलीजची वाट खूप आतुरतेनं पाहात आहेत. सध्या, 'जवान' यूएस $47.60 दशलक्ष कमाईसह परदेशात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट आहे. याशिवाय यूएस $47.85 दशलक्ष कमाई करत 'पठाण'ला देखील मागे टाकले आहे. आता जपानमध्ये देखील 'पठाण'ला मागे टाकण्याचे 'जवान'चे लक्ष्य असेल.