हैदराबाद - Lok Sabha Elections 2024 :लोकसभा निवडणुकीसाठी साऊथकडील तेलंगणा राज्यातील 17 जागांवर मतदान होत आहे. मतदानासाठी लोक पहाटेपासूनच मतदान केंद्रावर पोहोचत आहेत. दरम्यान साऊथ चित्रपटसृष्टीमधील अभिनेता ज्युनियर एनटीआर, अल्लू अर्जुन, मेगास्टार चिरंजीवी, पवन कल्याण', नागा चैतन्य 'आरआरआर' दिग्दर्शक एसएस राजामौली आणि त्यांचा मुलगा एसएस कार्तिकेय, या स्टार्सनं आपला मतदानाचा हक्क बजावला आहेत. अभिनेता पवन कल्याणनं मंगळागिरी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. आता या मतदान केंद्रावरून काही व्हिडिओ समोर आले आहेत. आता हे व्हिडिओ अनेकांना आवडत आहेत.
मतदान केंद्रावरून फोटो व्हायरल :नागा चैतन्यनं सकाळी मतदान केंद्रावरून जाऊन आपला हक्क बजावला आहे. नागा सध्या त्याच्या पुढील चित्रपट 'थंडेल'साठी चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर साऊथ अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहे.दरम्यान एसएस राजामौली हे मुलगा एसएस कार्तिकेयसह मतदान करण्यासाठी केंद्रावर पोहोचले होते. मतदान करताना पिता-पुत्र कॅमेऱ्यात कैद झाले. मतदान केल्यानंतर एसएस राजामौली यांनी थेट माध्यमांशी संवाद साधला. "आम्ही जबाबदार आहोत आणि आम्हाला देशाची काळजी आहे, कृपया घरातून बाहेर पडा आणि मतदान करा." याशिवाय अनेक स्टार्स आपल्या चाहत्यांना वोट करण्यासाठीचं आवाहन केलं आहे.