मुंबई - Sonam Kapoor birthday :बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर रविवारी आज 9 जून रोजी 39वा वाढदिवस साजरा करत आहे. तिनं बॉलिवूडमध्ये तिच्या फॅशन सेन्समुळे चाहत्यांमध्ये वेगळी ओळख निर्मान केली आहे. सोनम ही बॉलिवूड सुपरस्टार अनिल कपूरची मुलगी असून ती इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समध्ये पदवीधर आहे. तिनं 'सावरिया' चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. दरम्यान सोनमच्या वाढदिवसानिमित्त तिची बहिण रिया कपूरनं आणि तिच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणीनी तिला सुंदर सरप्राईज दिलंय. सोमननं आपला वाढदिवस स्कॉटलंडमध्ये साजरा केला. आता रिया कपूरनं वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची खास झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सोनम कपूर 39वा वाढदिवस (सोनम कपूरची इंस्टाग्राम स्टोरी (instagram)) सोनम कपूर 39वा वाढदिवस (सोनम कपूरची इंस्टाग्राम स्टोरी (instagram)) सोनम कपूर 39वा वाढदिवस (सोनम कपूरची इंस्टाग्राम स्टोरी (instagram)) सोनम कपूरचा वाढदिवस :सोनम कपूरनं पती आनंद आहुजाकडून मिळालेली खास गिफ्टचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. दरम्यान रियानं शेअर केलेल्या या क्लिपमध्ये सोनम कपूर तिच्या मित्र आणि मैत्रिणींबरोबर एका मोठ्या टेबलावर बसलेली दिसत आहे. वाढदिवस साजरा करत असलेल्या हॉलला सुंदर फुलांनी आणि फुग्यांनी सजवली आहे. मेणबत्त्या आणि फुलांनी सजवलेले टेबल देखील खूप आकर्षक आहे. दुसऱ्या क्लिपमध्ये, गायकाची एक झलक दाखवली आहे. या क्लिपच्या कॅप्शनमध्ये लोकेशनचा उल्लेख करताना रियानं लिहिलं की, 'ग्लेनिगल्स. मूड.' रियानं शेअर केले हे व्हिडिओ खूप सुंदर आहेत.
सोनम कपूर 39वा वाढदिवस (सोनम कपूरची इंस्टाग्राम स्टोरी (instagram)) सोनम कपूर 39वा वाढदिवस (सोनम कपूरची इंस्टाग्राम स्टोरी (instagram)) सोनम कपूर 39वा वाढदिवस (सोनम कपूरची इंस्टाग्राम स्टोरी (instagram)) आनंद आहुजानं दिसली पत्नीला खास भेट :दुसरीकडे सोनम कपूरनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पती आनंद आहुजाची भेट शेअर केली असून तिनं पोस्टवर लिहिलं, "माझ्या पतीनं दिलेले वाढदिवसाचे गिफ्ट. टागोरांच्या गीतांजलीची पहिली आवृत्ती इंग्रजीत अनुवादित झालेली. धन्यवाद आनंद आहुजा, मी अस काय पुण्य केलं आहे की तू मला मिळाला." सोनम कपूरनं पुस्तकात एक झलक चाहत्यांना दाखवली आहे. सोनमचा पती आनंद आहुजा एक यशस्वी बिझनेसमन आहे. दोघांनी 2018 मध्ये लग्न केलं. अलीकडेच सोनम आणि आनंद पालक झाले आहेत. सोनमनं अनेक चित्रपटात काम केलंय. यामध्ये 'नीरजा', 'भाग मिल्खा भाग', 'वीरे दी वेडिंग' आणि 'ब्लाइंड' यासारख्या चित्रपटांचा समावेश आहेत.
हेही वाचा :
- कंगना रनौतच्या झापडच्या घटनेवर हृतिक रोशनचं काय आहे मत? - hrithik roshan
- फिल्मी दुनियेत रामोजी रावांचाच दबदबा; 'ईटीव्ही मराठी'च्या माध्यमातून दिल्या सुपरहिट मालिका - Ramoji Rao passed away
- 'मी अभिनेता होणे ही रामोजी रावांचीच कृपा', रितेश देशमुखचं विधान, तर "मार्गदर्शक गुरू हरपले" रजनीकांतचं ट्विट - Ramoji Rao Passes Away