मुंबई- Sonakshi Sinha :अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा दिल्लीतील इंडिया कॉउचर वीकमध्ये डिझायनर डॉली जेसाठी शोस्टॉपर बनली. लग्नानंतरचा हा तिचा पहिला रॅम्प वॉक होता. सोनाक्षीनं 23 जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्न केल्यानंतर ती खूप चर्चेत आली होती. या लग्नासाठी अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं होतं. दरम्यान तिचे इंडिया कॉउचर वीकमधील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनाक्षीचा या कार्यक्रमामधील हा लूक अनेकांना आवडत आहेत. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ पापाराझीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सोनाक्षीनं लग्नानंतर पहिल्यांदा केला रॅम्प वॉक :या व्हिडिओमध्ये सोनाक्षीनं हाय स्लिट पिंक कलरचा गाऊन परिधान केला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. रॅम्पवर चालताना सोनाक्षीनं फॅशन शोमध्ये 'लव्हफूल' गाण्यावर डान्स केला. यानंतर एका संवादादरम्यान सोनाक्षीनं म्हटलं, "मला खरोखर वाटते की साधी वधूची फॅशन परत येणार आहे. खरे सांगायचं झालं तर, मला माझ्या लग्नाचा पुरेपूर आनंद घेण्याचं स्वातंत्र्य होतं, कारण माझ लग्न आमच्या घरी झालं होतं, जिथे मला खूप चांगले वाटलं. मी स्वतःवर कोणताही ताण घेतला नाही. आता साधा सुंदर वधूचा हा ट्रेंड नक्कीच परत येईल असं मला वाटतं." दरम्यान सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नात जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईक हजर होते.