महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'व्हॅलेंटाईन्स डे'च्या होम डेट नाईटला पाहता येतील असे रोमँटिक आणि हृदयस्पर्शी चित्रपट - व्हॅलेंटाईन्स डे

'व्हॅलेंटाईन्स वीक'सध्या सर्वत्र चर्चा होत असताना आम्ही तुम्हाला काही रोमँटिक चित्रपट सूचवत आहोत. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत पाहण्यासाठी प्रेमकथांपासून ते हृदयस्पर्शी कथानक असलेले हे चित्रपट तुम्हाला एक वेगळी अनुभूती देतील.

Valentine's Day
व्हॅलेंटाईन्स डे

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 6:06 PM IST

मुंबई - सध्या व्हॅलेंटाईन्स वीक सुरू असतानाच प्रेमी युगुलांना रोमान्सची चाहूल लागली आहे. नवीन काळातील प्रेमकथांपासून ते हृदयस्पर्शी कथानक असलेले अनेक असे चित्रपट आहेत ज्याचा आनंद तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीसह घेऊ शकता. या चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त झालेलं प्रेम चित्रपट संपल्यानंतरही आपल्या मनात कायम रुंजी घालत राहू शकेल.

डिजीटलच्या जमान्यात आपण वावरत असलो तरी असे काही अद्भूत चित्रपट आहेत जे आपल्या शालेय काळातील प्रेमाचीही आठवण करुन देतात. या 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या निमित्तानं प्रेम या अडीच अक्षरांची जादू समजून घेण्यासाठी आम्ही काही चित्रपट आपल्यासाठी सूचवत आहोत. आपण हे चित्रपट पाहण्यासाठी काढलेला वेळ नक्कीच कारणी लागेल असेच हे काही चित्रपट आहेत.

करीब करीब सिंगल:तनुजा चंद्रा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात इरफान खान आणि पार्वती थिरुवोथू मुख्य भूमिकेत आहेत. इरफान एका विक्षिप्त मध्यमवयीन योगीची भूमिका करतो जो मनापासून रोमँटिक आहे. त्याला कविता लिहायला आवडत असते आणि त्याच्या इच्छेनुसार तो जीवन जगतो. दरम्यान, या चित्रपटात पार्वतीने जया ही आयटी व्यावसायिक आणि शिस्तबद्ध जीवन जगणाऱ्या तरुण विधवेची व्याक्तीरेखा साकारली आहे. विरुद्ध व्यक्तीमत्त्व असलेल्या या दोन व्यक्ती ऑनलाइन डेटिंग अ‍ॅपद्वारे भेटतात. जेव्हा ते एकत्र ऋषिकेशला जातात तेव्हा त्यांची भेट अधिक अर्थपूर्ण बनते.

योगी जया नावाच्या एका तरुण विधवेला, आयुष्याकडे अधिक उदारपणे पाहण्यास, अनुभवण्यास आणि स्वीकारण्यास कशी मदत करतो, शेवटी तिच्या मनाला काय हवे आहे ते कसे शोधून काढतो यांचे सुंदर चित्रपट चित्रपटात पाहायला मिळते. हा चित्रपट Netflix आणि Zee5 वर स्ट्रीम करण्यासाठी उपलब्ध आहे.

96: श्रीराम राघवनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मेरी ख्रिसमस' चित्रपटामध्ये भूमिका साकारमाऱ्या विजय सेतुपतीची भूमिका असलेला हा चित्रपट आहे. सी. प्रेम कुमार यांनी दिग्दर्शित केलेला 2018 चा हा चित्रपट जुन्या शालेय प्रेमाची एक उत्कट भावना पडद्यावर मांडतो. विजय आणि तृषा कृष्णन यांच्या प्रमुख भूमिका असलेला, हा चित्रपट तुम्हाला एका अतुलनीय प्रेमाची अनुभूती देणारा आहे.

हायस्कूलमधील वर्गमित्र 22 वर्षानंतर त्यांच्या रियुनियनसाठी खूप काळानंतर भेटतात. त्याकाळी हायस्कूलमध्ये शिकणारी त्रिशा आणि राम यांची यावेळी पुन्हा भेट होते आणि ते भूतकाळाच्या आठवणीत रमतात. हा चित्रपट अलिकडच्या वर्षांत बनवलेल्या सर्वोत्कृष्ट रोमँटिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. जे त्यांच्या हायस्कूलच्या प्रेयसीसोबत राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी हा चित्रपट नॉस्टॅल्जिया निर्माण करण्याची शक्यता आहे. 96 हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

थ्री ऑफ यू: शेफाली शाह, जयदीप अहलावत आणि स्वानंद किरकिरे यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सजलेला हा चित्रपट आपल्याला कथेत पूर्णपणे खिळवून ठेवतो. या चित्रपटात सुरुवातीला शेफाली शाह स्मृतिभ्रंशाच्या आजारानं ग्रस्त झाली आहे. तिच्या वैवाहिक जीवनातील सांसारिकतेला तोंड देत, या संघर्षमय प्रवासाला सुरुवात करताना, ती तिच्या पतीसह कोकणच्या विस्तीर्ण किनारपट्टीवरून प्रवास करते. इथे ती आपल्या शालेय जीवनातील प्रेमाचा शोध घेते. यामध्ये शेफाली, जयदीप आणि स्वानंदने चित्रपटाच्या गतीशी अगदी योग्य प्रमाणात भावना व्यक्त केल्या आहेत. हा सुंदर चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहेत.

सीता रामम: दुल्कर सलमान आणि मृणाल ठाकूर स्टारर 'सीता रामम' ही अलीकडच्या काळातील काळातीत प्रेमकथांपैकी एक म्हणून ओळखली जाते. 1964 च्या काळात सेट केलेला, हा चित्रपट लेफ्टनंट राम आणि सीता महालक्ष्णी यांची सुंदर प्रेम कथा आहे.

काश्मीर सीमेवर सेवा करणारा अनाथ लष्करी अधिकारी रामचे आयुष्य सीता महालक्ष्मी नावाच्या मुलीचे पत्र मिळाल्यानंतर बदलते. एका पुस्तकात न उघडलेले अंतर्देशीय पत्र सापडल्यानंतर दिग्दर्शक हनु राघवपुडी यांना चित्रपट तयार करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

सीतेला शोधण्याचा आणि त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवण्याचा निर्धार करून, राम एका मोहिमेवर निघतो. शेवटी भेटल्यावर राम आणि सीता यांच्यात प्रेम फुलते. तथापि, जेव्हा राम पाकिस्तानमध्ये कैदेत असतो, तेव्हा त्यांना सीतेशी संपर्क करण्यापासून रोखत असताना त्यांच्या रोमान्सला अनेक आव्हांनांना सामोरे जावे लागते. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळेल.

मस्त में रहने का: जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट असलेला आयुष्यातील वेगळ्या वळणावर घडणारी सुंदर प्रेमकथा आहे. मुंबईच्या धकाधकीच्या पार्श्वभूमीवर एकाकीपणाच्या अनेक छटांचा शोध घेणारा हा एक चित्रपट आहे. विजय मौर्य यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 75 वर्षांच्या एकाकी विधुराच्या आयुष्यात घडलेल्या नाट्यमय घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

हेही वाचा -

  1. आलिया भट्टने शेअर केला शिकारीबद्दलचा जागरूकता व्हिडिओ, म्हणाली "शिकार हा खूनच"
  2. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका व्हायरल
  3. साऊथ अभिनेता मामूट्टी स्टारर मल्याळम चित्रपट 'ब्रमायुगम'चा ट्रेलर प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details