मुंबई- Mannara Chopra Birthday Bash : बहीण मन्नारा चोप्राचा वाढदिवस प्रियांका चोप्राने तिचा पती निक जोनाससह हजर राहून साजरा केला आणि कुटुंबाशी असलेलं त्याचं जवळचं नातं दाखवलं. परिणीती, मीरा आणि मन्नारा यांच्यासह तिच्या चुलत भावंडाबद्दल नेहमी प्रेम करणीरी प्रियांका त्यांच्या सर्व सुख दुःखात त्यांच्या पाठीशी कायम उभी असते. प्रियांका, निक आणि त्यांची मुलगी मालती मेरी बरोबर मन्नाराच्या 33 व्या वाढदिवसाला हजेरी लावून वातावरणात चैतन्य निर्माण केलं.
कार्यक्रमस्थळी पोहोचलेल्या प्रियांका आणि निक त्यांच्या आकर्षक पोशाखाने पार्टीतील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रियांका मॅचिंग स्कर्टसह पांढऱ्या ब्रॅलेटमध्ये देखणी दिसत होती, तर निकने पिवळी पँट आणि प्रिंटेड शर्टचा ट्रेंडी पोशाख परिधान केला होता. या जोडप्यानं पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या. पारंपरिक पद्धतीनं नमस्ते करत निक आणि प्रियांकानं शुभेच्छांची देवाणघेवाण केली.
वाढदिवसाच्या पार्टीपूर्वी, प्रियांका आणि निक यांनी नोएडामध्ये मन्नारा आणि इतर मित्र मैत्रीणींसह होळीचे रंग उधळले. अलिकडेच मुंबईतील बुलगारीच्या फ्लॅगशिप स्टोअरच्या उद्घाटनाला प्रियांका जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर तिनं भारताच्या अनेक स्थळांना भेट देऊन कुटुंबासह आनंद उत्सवात सहभाग घेतला. जानेवारीत भारताच्या दौऱ्यावर निक जोनास आला होता. त्यावेळीही त्यानं लोल्लापालूजा म्यूझिक इव्हेन्टमध्ये आपल्या भावांबरोबर परफॉर्मन्स देऊन चाहत्यांना खूश करुन सोडलं होतं.
कामाच्या आघाडीवर, प्रियांकाकडे तिच्या हातामध्ये अनेक आगामी प्रोजेक्ट आहेत. यामध्ये जॉन सीना आणि इद्रिस एल्बा सारखे स्टार आहेत. याशिवाय ती डिस्नेनेचरच्या 'टायगर' चित्रपटाला तिचा आवाज देईल. बॉलिवूडमध्ये, तिच्याकडे कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्यासह फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' हा चित्रपट आहे. 2021 मध्ये जाहीर झाल्यापासून हा चित्रपट मात्र अडकून पडला आहे. प्रियांकाने अलिकडेच संजय लीला भन्साळी यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोघे एका पिरियड अॅक्शनरसाठी एकत्र येत असल्याच्या कयासांना उधाण आले आहे.
हेही वाचा -
- मलायकाचा मुलगा अरहानच्या वाढदिवसाला अरबाज नवी पत्नी शशुरा खानसह हजर - ARHAAN KHAN BIRTHDAY PARTY
- "प्रिये, दोन अर्जुन कशी सांभळशील?" म्हणत अल्लु अर्जुननं केला पत्नीला सवाल - ALLU ARJUN AT MADAME TUSSAUDS DUBAI
- ७० एमएम स्क्रीनची मजा ७० सेंटीमीटरच्या मोबाईल स्क्रीनवर मिळणार नाही! : श्रुती मराठेची खास मुलाखत - interview with Shruti Marathe