मुंबई Singhasan Khali Karo Song : अभिनेत्री कंगना राणौत स्टारर पॉलिटिकल ड्रामा फिल्म 'इमर्जन्सी' मधील 'सिंहासन खाली करो' पहिलं गाणं आज 26 ऑगस्ट रोजी रिलीज झालय. नुकतीच 'सिंहासन खली करो' या गाण्याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. यानंतर आज हे गाणं रिलीज करून कंगनानं तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. 'सिंहासन खाली करो' गाण्यात या चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट दिसत आहे. हे गाणं उत्साहानं भरलेलं आहे. या चित्रपटाच्या रिलीजच्या 10 दिवस आधी गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यावर अनेकांनी पसंतीची मोहर उठवली आहे.
'सिंहासन खाली करो' हे गाणं कोणी गायलं : 'सिंहासन खाली करो' गाणं उदित नारायण, नकाश अजीज, नकुल अभ्यंकर यांनी एकत्र गायलय. हे गाणे जीव्ही प्रकाश कुमार यांनी संगीतबद्ध केलंय. या गाण्याचे बोल मनोज मुंतशीर यांनी लिहिले आहेत. कंगना राणौत, अनुपम खेर, श्रेयस तळपदे, दिवंगत अभिनेता सतीश कौशिक हे देखील या गाण्यात दिसत आहेत. 'इमर्जन्सी' या चित्रपटामध्ये कंगना राणौत भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट 1975 मध्ये लागलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये त्यावेळी झालेल्या महत्वाच्या राजकीय गोष्टी आणि सर्वसामान्यांवर आणीबाणीचा कसा परिणाम पडला याबद्दल दाखविण्यात आलं आहे.