मुंबई :अभिनेता अजय देवगणचा 'सिंघम अगेन' आणि 'कार्तिक आर्यन'चा 'भूल भुलैया 3' 1 नोव्हेंबरला चित्रपटगृहामध्ये एकाच दिवशी रिलीज झाला. दोन्ही चित्रपटांनी त्यांच्या पहिल्या वीकेंडमध्ये 100 कोटींचा टप्पा ओलांडला होता. आता दुसऱ्या वीकेंडमध्ये हे दोन्ही चित्रपट 200 कोटींचा टप्पा ओलांडण्याच्या काही पावलांवर आहेत. पहिल्या वीकेंडला, 'सिंघम अगेन'नं 121 कोटी तर 'भूल भुलैया 3'नं 104 कोटीची कमाई केली होती. सध्या बॉक्स ऑफिसवर 'सिंघम अगेन'नं कलेक्शनच्या बाबतीत 'भूल भुलैया 3'च्या पुढे आहे. मात्र दोन्ही चित्रपट लवकरच 200 कोटींचा टप्पा गाठण्यात यशस्वी होतील, असं सध्याचं चित्र दिसत आहे.
'सिंघम अगेन'चं कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'सिंघम अगेन'चं बॉक्स ऑफिसवर एकूण 8 दिवसांचे कलेक्शन 181 कोटी आहे. या चित्रपटानं 9व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 11.2 कोटी रुपयांची कमाई केली. याशिवाय चित्रपटाची दुसऱ्या वीकेंडचे एकूण कलेक्शन 192.5 कोटी रुपये झाले आहे. 'सिंघम अगेन'नं बॉक्स ऑफिसवर 43.5 कोटी कमाई करून सनी देओलच्या 'गदर 2'च्या ओपनिंग कलेक्शनचा विक्रम मोडला आहे. 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 40 कोटीची कमाई केली होती.
'भूल भुलैया 3'चा दुसरा वीकेंड कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित स्टारर 'भूल भुलैया 3' देखील कमाईच्या बाबतीत कमी नाही. या चित्रपटानं देखील बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. 'भूल भुलैया 3'नं 9 व्या दिवशी अंदाजे 15.50 कोटी कमावले. या चित्रपटाचे दुसऱ्या वीकेंडचे कलेक्शन 183 कोटी झाले आहे. 'भूल भुलैया 3'चं कलेक्शन 10व्या दिवशी 200 कोटींचा टप्पा पार करेल की नाही, याबाबत सांगता येत नाही. जर 'भूल भुलैया 3'नं 200 कोटींचा टप्पा ओलांडला तर, कार्तिक आर्यनच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा चित्रपट ठरेल. आतापर्यंत त्याच्या एकाही चित्रपटानं 200 कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर ओलांडलेला नाही.
'सिंघम अगेन'चं कलेक्शन
पहिला दिवस- 43.5 कोटी
दुसरा दिवस - 42.5 कोटी
तिसरा दिवस- 35.75 कोटी
चौथा दिवस - 18 कोटी
पाचवा दिवस - 14 कोटी
सहावा दिवस - 10.5 कोटी
सातवा दिवस - 8.75 कोटी
आठवा दिवस - 8 कोटी
नववा दिवस - 11.5 कोटी (अंदाजे)