शिर्डी : अनेक अडचणी आल्या मात्र साईबाबांचे नामस्मरण केल्यानं अडचणी दूर झाल्या. साईबाबांनी दिलेल्या श्रद्धा आणि सबुरी महामंत्राला धरून चालत आल्यानं अडचणी दूर झाल्याची भावना सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानची आई सलमा खान यांनी, साईं दर्शनानंतर व्यक्त केली. सलमान खानचा नुकताच 27 डिसेंबर रोजी गुजरात राज्यातील जामनगर येथे 59वा वाढदिवस साजरा करण्यात आला. सलमानच्या वाढदिवसाला संपूर्ण कुटुंबियांनासह अनेक नामांकित व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. 'भाईजान'चा वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याची आई सलमा खान आणि बहीण अलवीरा अग्निहोत्री यांच्या कुटुंबीयांनी आज सलमानच्या यश आणि दीर्घायुष्यासाठी शिर्डीत येऊन साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं.
सलमान खानची आई सलमा खाननं घेतलं शिर्डीत दर्शन : सलमा खान या साईभक्त असून नेहमी त्या दर्शनासाठी शिर्डीला येत असतात. मात्र मध्यंतरी कोरोना महामारीच्या काळात त्यांना साईबाबांच्या दर्शनासाठी येता आलं नाही. आज खुप वर्षांनी साईबाबांच्या दर्शनासाठी आल्यानं त्यावेळी त्या भावुक झाल्याचा दिसल्या. दर्शनाच्या वेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. साईबाबांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या कुटुंबियांनावर राहिला आहे, साईबाबांचा आशीर्वाद असाच कायम राहो अशी प्रार्थना सलमा यांनी साई चरणी केली.
सलमा खान आईनं केलं दर्शन : साईबाबांच्या दर्शनानंतर, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सलमा खान यांच्यासह संपूर्ण कुटूंबियांचा शॉल, साई मूर्ती देवून सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, प्रशांत सूर्यवंशी, मंदिर सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी, साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे, अरुण गायकवाड आदी उपस्थिती होते. सलमा खान यांना आज साईबाबांची माध्यान्ह आरती करण्याची इच्छा होती. मात्र त्यांना येण्यास उशीर झाल्यानं साईंचे दर्शनावर समाधान मानावं लागलं. दरम्यान सलमान खानच्या जीवाला धोका असल्यानं अनेकदा खान कुटुंब हे खूप सावध राहतात. तसेच सध्या सलमान खान हा त्याचा आगामी चित्रपट 'सिंकदर'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याचा हा चित्रपट 2025ला ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.
हेही वाचा :