ETV Bharat / state

विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन, ठाण्यातील मेकॅनिकची मुलगी बनली पायलट - PILOT SEJAL YADAV

आजच्या मुली कोणत्याही गोष्टीत मागे नाहीत आणि काळाच्या बरोबरीने त्या पाऊल टाकत आहेत. ठाण्यातील सेजल यादव (Sejal Yadav) ही बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन पायलट बनली.

Sugriv Yadav Become Pilot
मेकॅनिकची मुलगी सेजल यादव झाली पायलट (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2024, 7:20 PM IST

ठाणे : वाहनं दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या मेकॅनिकच्या मुलीनं आपल्या वडिलांचं नाव रोशन केलं आहे. ठाणे परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय सेजल यादवने (Sejal Yadav) एअर फोर्समध्ये आपली जागा निश्चित केली. अतिशय बिकट परिस्थितीत तिनं शिक्षण घेऊन एअर फोर्समध्ये प्रवेश मिळवल्यानं तिच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

अत्यंत बिकट परिस्थतीत घेतलं शिक्षण : सेजल यादवचे शिक्षण अत्यंत गरीबीत झालं. वडील सुग्रीव यांचं गॅरेज आहे आणि आई गीता गृहिणी आहेत. अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या सेजलला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. सेजलला डॉक्टर बनण्याची इच्छा होती. मात्र चांगले टक्के मिळाल्यानंतर पुढे डॉक्टर बनण्यासाठी खूप खर्च होतो आणि तो तिच्या वडिलांना परवडणारा नसल्यानं तिनं डॉक्टर बनण्याच्या इच्छेकडं पाठ फिरविली. त्यानंतर तिनं अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. सेजलला एनसीसी आणि सशस्त्र दलात संधी मिळाली आणि तिला इंडियन एअर फोर्समध्ये बोलवण्यात आलं. तेव्हा सेजलनं खूप परिश्रम घेतले.

दोन ते चार तासाची घेतली झोप : अभियांत्रिकी अभ्यासासोबत एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट (एएफसीएटी) ची सेजलनं तयारी केली. दिवसा अभियांत्रिकीचा अभ्यास आणि रात्री एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट (एएफसीएटी) चा अभ्यास सेजल करू लागली. केवळ दोन ते चार तासाची झोप तिला मिळायची. शिक्षणाचा खर्च वडिलांवर पडू नये म्हणून तिने शिष्यवृती मिळवून पुढील शिक्षणाचा मार्ग स्वीकारल्याचं तिचे वडील सुग्रीव यादव हे अभिमानाने सांगतात.

वर्षभर घेणार प्रशिक्षण : सेजलचा आत्मविश्वास आणि जिद्दीनं तिनं बाळगलेली महत्वाकांक्षा तडीस नेली. आता तिनं ध्येय गाठलं. पण त्यावर ती समाधानी नाही, तर आयएएफमध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून सामील होण्यापूर्वी सेजल वर्षभर प्रशिक्षण घेणार आहे. त्यानंतर सेजल प्रशिक्षणादरम्यान एखाद्या क्षेत्रात स्पेशलायझेशन निवडणार असल्याची इच्छा सेजलनं व्यक्त केली.

हेही वाचा -

  1. निराशेतून उभारी घेत शेतकरी महिला बनली 'ड्रोन पायलट'; 'ड्रोन दीदी'ची थक्क करणारी यशोगाथा - Drone Pilot Woman
  2. Pune Metro: पुणे मेट्रोमध्ये तब्बल नऊ महिला पायलट, जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी यश
  3. डीजीसीएचा तृतियपंथीय पायलटना हिरवा कंदिल मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमान उडवण्याची परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.