ETV Bharat / entertainment

विकी आणि कतरिना कैफ विमातळावर झाले स्पॉट, नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सज्ज.. - NEW YEAR 2024

कतरिना कैफ आणि विकी कौशल नवीन वर्ष साजरे करण्यासाठी बाहेर जात असल्याचं समजत आहे. आता त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Katrina Kaif and Vicky Kaushal
कतरिना कैफ आणि विकी कौशल (कतरिना कैफ आणि विकी कौशल (@katrinakaif Instagram))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 29, 2024, 4:00 PM IST

मुंबई - अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सुट्टीवर जात आहेत. आता दोघे मुंबई विमानतळावर एकत्र स्पॉट झाले. विमातळावर या जोडप्यानं त्यांच्या स्टायलिश कॅज्युअल आउटफिट्सनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. आता त्यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघेही कारमधून उतरल्यानंतर विमानतळाच्या दिशेन जात आहे. 29 डिसेंबरला विमानतळावर विकी कौशल आणि कतरिना कैफ आपल्या स्टायलिश अंदाजात एकत्र दिसले. यावेळी कतरिनानं राखाडी रंगाचा स्वेटशर्ट , स्वेटपँट आणि पांढरी टी-शर्ट परिधान केली होती. यावर तिनं आपले केस खुले सोडले होते. काळ्या सनग्लाससह कॅट खूप सुंदर दिसत होती.

विकी आणि कतरिना नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सज्ज : दुसरीकडे विकीनं विमातळावरील लूकसाठी पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाचा जीन्स परिधान केला होता. या लूकमध्ये तो खूप देखणा दिसत होता. अलीकडेच, या जोडप्यानं लंडनमध्ये जवळच्या मित्रांसह आणि कुटुंबियाबरोबर ख्रिसमस साजरा केला होता. या जोडप्यानं आपल्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या जोडप्यानं शेअर केले फोटो हे, त्यांच्या चाहत्यांना खूप आवडले होते. दरम्यान विकी आणि कतरिना सुट्टीसाठी कुठे जात आहेत, हे अद्यापही कळलेले नाहीत. आता विकी आणि कॅटच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण या जोडप्याला कुठे जात असल्याचा प्रश्न विचारत आहेत. याशिवाय काही चाहते त्याच्या या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

विकी आणि कतरिनाचं वर्कफ्रंट : विकी आणि कतरिनाच्या लग्नाला तीन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. दरम्यान या जोडप्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर , कतरिना शेवटी श्रीराम राघवनच्या 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेता विजय सेतुपतीबरोबर दिसली होती. याशिवाय पुढं ती फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्राबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. दरम्यान विकीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तो पुढं, संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्टबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट 20 मार्च 2026 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होऊ शकतो. तसेच विकीचा 'छावा' चित्रपट देखील 2025मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आहे.

हेही वाचा :

  1. अभिनेत्री कतरिना कैफ साईचणी झाली नतमस्तक, शिर्डीत येऊन घेतलं साई समाधीचं दर्शन
  2. विकी कौशल आणि कतरिना कैफ जोधपूरमध्ये त्यांचा लग्नाचा तिसरा वाढदिवस करणार साजरा...
  3. कॅटरिना कैफचं दिग्दर्शनात पदार्पण? तिच्या पहिल्या प्रोजेक्टच्या व्हिडिओत व्हिएफएक्सची धमाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.