मुंबई -बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवणारे गायक दर्शन रावल लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानं आपली गर्लफ्रेंड धरल सुरेलियाबरोबर लग्न केलंय. हे दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. धरल त्याची सर्वात चांगली मैत्रीण आहे. दर्शननं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या लग्नाबद्दलची आनंदाची बातमी शेअर केली आहे. आता त्याच्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करू प्रतिक्रिया देत त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये हे नवविवाहित जोडपे खूप सुंदर दिसत आहे.
गायक दर्शन रावलनं बेस्ट फ्रेंडसोबत गुपचुप केलं लग्न, फोटो व्हायरल - SINGER DARSHAN RAVAL
दर्शन रावलनं शनिवारी 18 जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यात तो त्याच्या वधू धरल सुरेलियाबरोबर दिसत आहे.
By ETV Bharat Entertainment Team
Published : Jan 19, 2025, 10:36 AM IST
|Updated : Jan 19, 2025, 1:59 PM IST
दर्शन रावल आणि धरल सुरेलियाचं लग्नामधील लूक : लग्नाच्या या खास प्रसंगी दर्शन आणि त्याची पत्नी धरल सुरेलिया यांनी सुंदर पोशाख परिधान केला होता. लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये धरल खूप सुंदर दिसत आहे. या लेहेंग्यावर सुंदर भरतकाम केलं आहे. लूकला आणखी सुंदर बनविण्यासाठी धरलनं दोन दुपट्टे यावर घेतले आहेत. दुसरीकडे दर्शन रावलनं आयवरी रंगाच्या चिकनकारी शेरवानी परिधान केली आहे. एका फोटोमध्ये, दर्शन मंडपात त्याची वधू धरलच्या हाताती किस घेताना दिसत आहे.
दर्शनची पत्नी धरल सुरेलिया कोण आहे? :तुम्ही सर्वजण दर्शनच्या पत्नीबद्दल जाणून घेऊ इच्छित असणार, तर दर्शनची पत्नी धरल सुरेलिया एक आर्किटेक्ट आणि डिझायनर आहे. धरलनं बॅबसन कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर तिनं एंटरप्रेन्योरशिप में एम.एससीची डिग्री पदवी प्राप्त केली. ती बटर कॉन्सेप्ट्स नावाच्या डिझाइन फर्मची संस्थापक देखील आहे. दरम्यान दर्शन रावलच्या विवाहबद्दल कोणालाही माहिती नव्हती. त्यांच्या लग्नाचे फोटो अचानक समोर आल्यानंतर सर्वांनाच एक सुखद धक्का बसला. दर्शननं अनेक हिट गाणी दिली आहेत. त्याची गाणी देखील खूप हिट झाली आहेत. दरम्यान दर्शनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यानं 'मैं वो चांद', खेंच मेरी फोटो, 'जब तुम चाहो', 'बेखुद', 'मेरी मैया किन्ना सोना,'ओधनी, 'तेरे शिवा जग में' यासारख्या गाण्यांना आपला आवाज दिला आहे.