मुंबई - कोरियन ड्रामा पाहायला आजकाल अनेकांना आवडते. अनेक उत्तम कोरियन सीरीज ओटीटी प्लेटफार्मवर उपलब्ध आहेत. सध्या कोरियन सीरीजनं ओटीटीवरही वर्चस्व गाजवलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोरियन सीरीजबद्दल भारतात प्रचंड क्रेझ आहे. जर तुम्हालाही के-ड्रामा पाहण्याची आवड असेल, तर आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला अशा पाच सीरीजबद्दल सांगणार आहोत, ज्या पाहूण तुम्हाला देखील खरा प्रेम करणार व्यक्ती आठवेल. या सीरीज ओटीटी प्लेटफार्मवर हिंदी भाषेतही उपलब्ध आहेत.
1 'क्वीन ऑफ टीयर्स' : रोमँटिक-कॉमेडी ड्रामा 'क्वीन ऑफ टीयर्स' हा 2024 मधील सर्वोत्तम के-ड्रामांपैकी एक आहे. किम जी-वॉन, किम सू-ह्यून, पार्क सुंग-हून सारखे कलाकार असलेला ही सीरीज वैवाहिक जीवनातील संकटावर आधारित आहे. आयएमडीबीवर या सीरीजला 8.2 रेटिंग मिळाली आहे. जी-वॉन, किम (हॉन्ग हे-इन), (बैक ह्युं वू) किम सू-ह्यून सीरीजमध्ये त्याच्या वैवाहिक जीवनात आनंदी नसतात. या दोघांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, मात्र जीवनातील कठिण दिवसांमध्ये बैक ह्युं वू हा हॉन्ग हे-इनला साथ देतो, यानंतर त्यांच्यातील प्रेम दाखवले जाते. हा रोमॅंटिक ड्रामा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
2 'लव्हली रनर' : 'लव्हली रनर' ही काल्पनिक कोरियन सीरीज आहे, जी प्रेक्षकांना खूप पसंत पडली होती. या सीरीजमध्ये बियोन वू-सोक आणि किम हये-यूं हे मुख्य भूमिकेत आहेत. टुमॉरोज बेस्ट या कादंबरीवर आधारित या नाटकाला आयएमडीबीवर 8.6 रेटिंग मिळाली आहे. 'लव्हली रनर' सीरीज एक टाइम-ट्रॅव्हल प्रेमकथा आहे, जी इम सोल (किम हये-यूंनं साकारलेल्या) पात्रावर आधारित आहे, ती आपल्या बॉयफ्रेंड सन जे (बियोन वू-सोक)ला शोधण्यासाठी प्रवास करते. ती टाइम-ट्रॅव्हल करून करून भविष्य हे चांगल करण्याचा प्रयत्न करते, ही सीरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
3 'माई डेमन' : 'माय डेमन' रोमँटिक,थ्रिलिंग आणि कॉमेडी ड्रामा आहे. या सीरीजमध्ये एक डेमन हा आपली शक्ती तात्पुरती गमवतो. ही शक्ती दो दो-ही (किम यू-जंग) हिच्याकडे जाते. यानंतर जिओंग गु-वोन (सॉन्ग कांग) हा आपली शक्ती पुन्हा परत मिळविण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरिज करतो. यानंतर एका साध्या मुलीमध्ये आणि डेमनमध्ये प्रेम दाखवलं गेलं आहे. आयएमडीबीवर या सीरीजला 7.7 रेटिंग दिली गेली आहे. ही सीरीज नेटफ्लिक्सवर आहे.
4 'बिजनेस प्रपोजल' : 'बिजनेस प्रपोजल'मध्ये शिन हा-री ( किम सेजियोंग) नावाच्या एका कर्मचाऱ्याची कहाणी आहे, जी तिच्या मैत्रिणीऐवजी एका ब्लाइंड डेटवर जाण्यास तयार होते. यानंतर तिला कळते की, तिची डेट प्रत्यक्षात तिचा बॉस आहे. हा ड्रामा एक रोमँटिक आहे, यामध्ये एक सीईओ आणि एका साधारण कर्मचाऱ्याच्या प्रेमात कसा पडतो हे दाखविले गेलं आहे. या ड्रामाला आयएमडीबीवर 8.1 रेटिंग दिली गेली आहे. ही सीरीज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
5 मिस्टर प्लँक्टन : 'मिस्टर प्लँक्टन' या रोमँटिक-कॉमेडी सीरीजमध्ये वू दो-ह्वान, ली यू-मी, ओह जंग-से आणि किम हे-सूक सारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ही कहाणी एका आजारी माणसाची आहे, जो त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबरोबर त्याच्या बायोलॉजिकल वडिलांच्या शोधात निघतो. आयएमडीबीवर या सीरीजला 8.1 रेटिंग मिळाली आहे. ही सीरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.