मुंबई- SIIMA 2024 :दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सायमा (SIIMA) 14 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. हा पुरस्कार सोहळा दुबईत आयोजित करण्यात आला होता. तेलुगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील विजेत्यांची नावे शनिवारी जाहीर करण्यात आली, तर तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कलाकार आणि चित्रपटांची नावे रविवारी 15 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, साऊथ अभिनेत्री नयनतारा आणि चियान विक्रम यांचा सायमा 2024मध्ये दबदबा होता. ऐश्वर्या आणि विक्रम यांना तमिळमधील 'पोनियिन सेल्वन 2' मधील त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि अभिनेता (समीक्षक) पुरस्कार मिळाले. तसेच रजनीकांत यांना 'जेलर'चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब मिळाला.
सायमा 2024 तमिळ विजेत्यांची संपूर्ण यादी...
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - जेलर (सन पिक्चर्स, नेल्सन दिलीप कुमार)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - नेल्सन दिलीप कुमार (जेलर)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नयनतारा (अन्नपूर्णी)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता - विक्रम (पोनियिन सेल्वन: २)
- सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक - विग्नेश राजा (पोर थोझिल)
- सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री - प्रीती अंजू असरानी (अयोथी)
- सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता - हृदय हारून (ठग्स)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (समीक्षक) -अरुण कुमार सोनाइमुथु (चिट्ठा)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) - ऐश्वर्या राय बच्चन (पोनियिन सेल्वन: २)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) शिवकार्तिकेयन (मावीरन)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सरिता (मावीरन)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - वसंत रवी (जेलर)
- सर्वोत्कृष्ट नकारात्मक अभिनेता - अर्जुन (लिओ)
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर - थेनी ईश्वर (मामन्नान)
- सर्वोत्कृष्ट गीतकार - विग्नेश शिवन (जेलर से रथमारे)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) - सीन रोल्डन (गुड नाइट से नान गाली)
- सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता - योगी बाबू (जेलर)
- राइजिंग स्टार - संदीप किशन
- एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मेंस ऑफ द ईयर - एसजे सूर्या
- मोस्ट प्रॉमिसिंगर - कविन, दादा
- इमर्जिंग प्रोड्यूसर ऑफ द ईयर – कन्नन रवि, रावण कोट्टम