महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

श्वेता तिवारीनं तिच्या थायलंडच्या सुट्टीतील हॉट फोटो केले इन्स्टाग्रामवर शेअर - shweta tiwari share hot pictures - SHWETA TIWARI SHARE HOT PICTURES

Shweta tiwari : श्वेता तिवारीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये ती खूप देखणी दिसत आहे.

Shweta tiwari
श्वेता तिवारी (instagram - Shweta tiwari)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 5:40 PM IST

मुंबई - Shweta tiwari : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी दररोज तिचे सुंदर फोटो शेअर चाहत्यांबरोबर शेअर करत असते. 43 वर्षांची असूनही, श्वेता खूप देखणी दिसते. तिच्या तुलनेत नवीन काळातील अभिनेत्रींचे सौंदर्य देखील फिके पडते. एवढेच नाही तर सौंदर्यासोबतच फिटनेस बाबतीतही श्वेता खूप काळजी घेत असते. दरम्यान, नुकतेच श्वेता तिवारीनं तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. श्वेता तिच्या कुटुंबाबरोबर थायलंडमध्ये सुट्टी साजरी करत आहे. आता श्वेताचे सोशल मीडियावर फोटो पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत. तिचे फोटो अनेकांना आवडत आहेत.

श्वेता तिवारीनं शेअर केले फोटो :पांढरा ब्रॅलेट आणि काळी शॉर्ट्स परिधान केलेली श्वेता बीचवर किलर पोझ देऊन चाहत्यांचे होश उडवताना दिसत आहे. सनग्लासेस आणि कमीत कमी मेकअपनं तिनं तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोंमध्ये तिचे सौंदर्य आणि फिटनेस पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. आता तिनं शेअर केलेल्या फोटोवर अनेकजण कमेंट्स करून तिला काही प्रश्न विचारत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, "तुम्ही कोणत्या गिरणीचे पीठ खाता, मॅडम' तुम्ही खूप हॉट दिसत आहात." दुसऱ्या एकानं लिहिलं, "श्वेता तू नाश्तामध्ये काय खात असते." आणखी एकानं लिहिलं, "मॅडम मी तुमचा खूप मोठा चाहता आहे, तुम्ही खूप सुंदर दिसता." याशिवाय काहीजण या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

या शोद्वारे मिळाली प्रसिद्धी : श्वेता तिवारीनं आपल्या लूकनं लोकांना वेड लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. ती अनेकदा तिच्या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून देते. श्वेता तिवारी बी टाऊनच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. इंडस्ट्रीत काम करून बरीच वर्षे उलटून गेली आहेत, तरीही आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. 10 वर्षांहून अधिक काळ ग्लॅमरच्या दुनियेत सक्रिय असलेली श्वेता तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या सौंदर्यानं आणि किलर स्टाईलनेही लोकांमध्ये लोकप्रिय आहे. श्वेता तिवारी दोन मुलांची आई आहे, पण या वयातही 23 वर्षांच्या मुली सारखी ती दिसते. श्वेताला 'कसोटी जिंदगी की' या शोद्वारे प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर तिनं अनेक शोमध्ये काम केलं होतं.

हेही वाचा :

  1. सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणाचं पुन्हा राजस्थान कनेक्शन, आरोपींना पैसे पुरविणाऱ्या आरोपीला अटक - salman khan house firing case
  2. मेट गालामध्ये आलिया भट्टनं परदेशी भूमीवर फडकवला भारतीय संस्कृतीचा झेंडा, पाहा फोटो - ALIA BHATT MET GALA 2024
  3. आलिया भट्टचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांनी केली नाराजी व्यक्त - Alia Bhatt Deepfake Video

ABOUT THE AUTHOR

...view details