Shweta Bachchan Birthday: हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन 17 मार्च रोजी तिचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. श्वेताची मुलगी नव्या नवेली नंदानं तिला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. नव्यानं तिच्या आईचे काही खास फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती देखील आपल्या आईबरोबर दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ''वाढदिवसाच्या शुभेच्छाआई, मी तुझ्यावर खूप प्रेम करते.'' नव्यानं लहानपणीचे कधी न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. आता नुकतीच श्वेता बच्चन नव्याच्या शोमध्ये दिसली होती.
श्वेता बच्चनचा वाढदिवस : यावेळी श्वेतानं तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल सांगितलं होतं. याशिवाय तिनं तिच्या अपयशाबद्दल सांगताना म्हटलं होत की, ''माझ्यावर कधीही आई-वडिलांनी दबाव आणला नाही, मला जे वाटले मी ते केले.'' यानंतर तिनं पुढं सांगितलं, ''जेव्हा माझे पुस्तक विकले गेले नाही, तेव्हा मी लिहिनं बंद केलं होतं.'' श्वेता बच्चन ग्लॅमरच्या जगापासून दुर आहे. याशिवाय नव्या देखील चित्रपटसृष्टीपासून दुर असते. नव्या ही अनेकदा सामाजिक कार्य करताना दिसते. नव्या बॉलिवूड पार्ट्यांमध्येअनेकदा दिसत. तिचा फॅशन सेन्स चाहत्यांना खूप आवडतो. याशिवाय करण जोहरनं देखील श्वेताला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.