मुंबई - Shraddha Kapoor: 'स्त्री 2' अभिनेत्री श्रद्धा कपूरनं नुकतीच भुवन बामच्या 'ताजा खबर सीझन 2'च्या स्क्रिनिंगला हजेरी लावली. जिथे बॉडीगार्डनं तिच्या फॅनला धक्काबुक्की केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर आता नेटिझन्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर श्रद्धाच्या बॉडीगार्डवर आता टीका केली जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, श्रद्धा कपूर तिच्या कारमधून खाली उतरून रेड कार्पेटकडे जाताना दिसत आहे. यानंतर तिच्या भोवती गर्दी जमते. श्रद्धाचा एक चाहता फोटो काढण्यासाठी मोबाईल घेऊन तिच्याकडे जातो.
श्रद्धाच्या चाहत्याला बसला धक्का : यानंतर अचानक एक बाउन्सर त्याला ढकलून देतो. बाऊन्सर हा श्रद्धाला पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करतो. हा सुरक्षा रक्षक खास श्रद्धासाठी होता की, तो कार्यक्रमाच्या सुरक्षा पथकाचा भाग होता हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी बॉडीगार्डवर चाहत्याशी असभ्य वर्तन केल्याबद्दल टीका केली आहे. काहींनी असा युक्तिवाद केला की, चाहत्यांनी सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार केला पाहिजे. त्यांच्याभोवती गर्दी करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नये. सध्या श्रद्धाकडून कोणतीही विशेष प्रतिक्रिया आली नाही.