महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

होळीच्या नावाखाली श्वानांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे भडकली श्रद्धा कपूर, केला व्हिडिओ शेअर - shraddha kapoor - SHRADDHA KAPOOR

Shraddha kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूरनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत श्वानाबरोबर अत्याचार होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून ती चांगलीच संतापली आहे.

Shraddha kapoor
श्रद्धा कपूर

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 5:38 PM IST

मुंबई - Shraddha kapoor :हिंदी चित्रपटसृष्टीती सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूर ही प्राणीप्रेमी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तिच्याकडे देखील एक श्वान आहे, ज्याची ती खूप काळजी घेते. ती अनेकदा सोशल मीडियावर तिच्या पाळीव प्राण्याबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. कोणी प्राण्यांशी गैरवर्तन केल्यास श्रद्धा कपूरला अजिबात आवडत नाही. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये होळीच्या नावाखाली श्वानांचा छळ केला जात आहे. आता हा व्हिडिओ श्रद्धानं पाहिल्यानंतर तिला राग आला आहे. श्वानांचा छळ करत असणाऱ्या लोकांवर श्रद्धा चांगलीच संतापली आहे.

श्रद्धा कपूरनं पोस्ट केली शेअर : श्रद्धा कपूरनं तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला आहे, ज्यामध्ये काही लोक होळीच्या नावाखाली श्वानशी गैरवर्तन करताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या पहिल्या क्लिपमध्ये एक माणूस त्याच्या श्वानला पकडून जबरदस्तीनं रंगात ओढताना दिसत आहे. दुसऱ्या क्लिपमध्ये एक व्यक्ती जबरदस्तीनं श्वानाला बांधून त्याच्यावर रंग टाकताना दिसत आहे. हे दोन्ही व्यक्ती स्वतःच्या आनंदासाठी प्राण्याला त्रास देत असल्याचे दिसत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करताना तिनं लिहिलं, ''जर तुम्हाला कोणी असे वागताना दिसले तर कृपया काही कारवाई करा.''

श्रद्धा कपूरचा वर्क फ्रंट : श्रद्धा कपूर शेवटी 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटात रणबीर कपूरबरोबर दिसली होती. आता पुढं ती राजकुमार रावबरोबर 'स्त्री 2'मध्ये दिसणार आहे. श्रद्धा कपूर याआधी 'स्त्री'मध्ये दिसली होती. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट झाला होता. आता श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री 2' हा चित्रपट हॉरर आणि कॉमेडी आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर राजकुमार राव व्यतिरिक्त वरुण धवन, अपारशक्ति खुराना, तमन्ना भाटिया, पंकज त्रिपाठी,आकाश दाभाडे, विजय राज आणि अभिषेक बॅनर्जी दिसणार आहेत. याशिवाय ती 'चंदू चॅम्पियन'मध्ये कार्तिक आर्यन आणि कॅटरीना कैफबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट स्पोर्ट ड्रामा चित्रपट आहे.

हेही वाचा :

  1. होळीच्या निमित्तानं सोशल मीडियावर अभिनेत्रींनी फोटो आणि व्हिडिओ केले शेअर - Holi celebration
  2. परिणीती चोप्राचं फॅन पेज बनलं "वधू वर सूचक मंडळ", परीने बना दी जोडी!! - Parineeti Chopra become Matchmaker
  3. तापसी पन्नूनं उदयपूरमध्ये बॅडमिंटनपटू मॅथियास बोशी केलं लग्न? फोटो व्हायरल - Taapsee pannu

ABOUT THE AUTHOR

...view details