मुंबई : साऊथची सुपरस्टार लेडी नयनतारा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल' डॉक्युमेंटरी आता सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय बनली आहे. साउथ स्टार धनुषनं यापूर्वी नयनतारा, पती विघ्नेश शिवन आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स इंडियाला नोटीस पाठवून त्याच्या 'नानुम राउडी धन'मधील अनधिकृत फुटेज वापरल्याबद्दल 10 कोटी रुपयांची मागणी केली होती. नयनतारा स्टारर 'चंद्रमुखी'च्या शिवाजी प्रॉडक्शन हाऊसनं 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल'मध्ये चित्रपटामधील फुटेज वापरल्याबद्दल तिच्याकडून 5 कोटी रुपयांची मागणी केली, असल्याचा दावा सोशल मीडियावर आता केला जात आहे.
शिवाजी प्रॉडक्शन हाऊसनं दिलं स्पष्टीकरण :फिल्म इंडस्ट्री ट्रॅकर मनोबाला विजयबालन यांनी नयनताराला शिवाजी प्रॉडक्शननं जारी केलेली एनओसी एक्सवर शेअर केली आहे. यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, नयनतारानं तिच्या माहितीपटासाठी एनओसी मिळवली आहे. व्हायरल झालेल्या प्रमाणपत्राचा दावा आहे की, नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल'मधील फुटेज वापरण्यास शिवाजी प्रॉडक्शनचा कोणताही आक्षेप नाही. तसेच याप्रकरणी शिवाजी प्रॉडक्शन हाऊसनं स्पष्टीकरण दिलं की, 5 कोटी नुकसान भरपाईचा करण्याचा दावा हा खोटा आहे.