मुंबई - तेलुगू सुपरस्टार महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची मुलगी सितारा घट्टमनेनी हिनं २० जुलै रोजी तिचा १२ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या आई वडिलांनी लाडक्या मुलीसाठी इंस्टाग्रामवर मनापासून शुभेच्छा व्यक्त केल्या.
महेशने सिताराचा गोल्डन अवर सेल्फी शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिलं, "हॅपी 12 माय लिटिल वन! सितारा, तुझ्यासाठी आजचा दिवस सर्वोत्कष्ट जावो. तुला हवं ते सर्व काही मिळत राहो. तेजस्वी ताऱ्यासारखं तू चमकत राहावं. तुझ्यावर खूप खूप प्रेम, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"
दरम्यान, नम्रतानं सिताराच्या बालपणातील क्षण दाखवणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये एक हृदयस्पर्शी संदेश आहे: "माझ्या प्रवासातील आवडत्या छोट्या सहप्रवासीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विविध देश, अगणित आठवणी, तू नेहमीच माझी छोटी मार्गदर्शक राहिली आहेस. तू माझा प्रत्येक प्रवास संस्मरणीय बनवला आहेस. तू किती अप्रतिम मुलगी म्हणून वाढली आहेस, मी तुझ्यावर प्रेम करते."
महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांनी 10 फेब्रुवारी 2005 रोजी लग्न केलं आणि त्यांना गौतम नावाचा मुलगाही झाला. गेल्या वर्षी सिताराची एका ज्वेलर्स ब्रँडसाठीची भव्य जाहिरात न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर झळकली होती. एका प्रतिष्ठीत ब्रँडची ती ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. टाइम्स स्क्वेअरमध्ये तिला समर्पित ज्वेलरी लाइनसह निवडलेली ती सर्वात तरुण स्टार किड बनली होती.