मुंबई - Shefali Jariwala : 'बिग बॉस' फेम शेफाली जरीवालानं उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात पहाटे 4 वाजता होणाऱ्या भस्म आरतीला हजेरी लावली होती. आता तिचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. व्हिडिओत शेफाली जरीवाला महादेवाची पूजा करताना दिसत आहे. 'काटा लगा' या गाण्यानं शेफाली ही प्रसिद्ध झोतात आली होती. शेफालीनं सोमवारी 20 मे रोजी कुटुंबासह महाकालेश्वर दरबारात पोहोचून बाबा महाकालचे आशीर्वाद घेतला. याआधीही अनेक स्टार्सनी महाकालेश्वर मंदिरात बाबा महाकालचे दर्शन घेतलंय. शेफाली तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
शेफाली जरीवालानं घेतलं महाकालेश्वर मंदिरात दर्शन : शेफाली तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक लहान मोठी अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आता तिनं महाकालेश्वर मंदिरातील तिच्या कुटुंबाबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. दरम्यान मीडियाबरोबर बोलताना शेफाली जरीवालानं म्हटलं, "मला अनेक वर्षांपासून येथे भस्म आरतीसाठी येण्याची इच्छा होती. आज ही इच्छाही पूर्ण झाली आहे. बाबा महाकालचे दर्शन घेऊन त्यांची पूजा केल्यावर मला खूप बरे वाटत आहे. मला इथे येऊन खूप आनंद झाला आहे आणि मला वाटतं प्रत्येकानं एकदा तरी इथे यावं." एवढेच नाही तर सोमवारी सकाळपासून सुरू होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान करण्याचे आवाहनही तिनं देशातील मतदारांना केलं आहे.