महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अजय देवगण आर माधवन आणि ज्योतिका स्टारर 'शैतान'ची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई - Shaitaan Box Office

Shaitaan Box Office Day 1 Collection : अजय देवगण, आर. माधवन आणि साऊथ अभिनेत्री ज्योतिका यांच्या 'शैतान' या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. हा चित्रपट काळ्या जादूवर आधारित आहे.

Shaitaan Box Office Day 1 Collection
शैतानचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 11:23 AM IST

मुंबई - Shaitaan Box Office Day 1 Collection : अजय देवगण, आर. माधवन आणि साऊथ अभिनेत्री ज्योतिका स्टारर 'शैतान'नं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. हा चित्रपट 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा क्रेझ आता पाहायला मिळत आहे. अजय, माधवन आणि ज्योतिका हे तिन्ही स्टार्स पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र काम करत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहे. चित्रपटानं पहिल्या दिवशी किती कमाई केली आणि पहिल्या वीकेंडमध्ये चित्रपट किती कमाई करू शकतो हे जाणून घेऊया.

'शैतान'नं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं :काळ्या जादूवर आधारित या चित्रपटाला यूए (U/A) प्रमाणपत्र मिळालं आहे. यामध्ये आर. माधवननं खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'शैतान' चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांना खूप आकर्षक केलं होतं. ट्रेलरमध्ये अजय, माधवन आणि ज्योतिका यांनी त्यांच्या चाहत्यांना हा चित्रपट पाहण्यास भाग पाडलं होतं. 'शैतान'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी हिंदी पट्ट्यांमध्ये 25.70 टक्के ऑक्युपन्सी रेट नोंदवला आहे. आता सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'शैतान'च्या पहिल्या दिवशीच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 14.2 कोटीची कमाई केली आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या दुसऱ्या दिवसात आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी हा चित्रपट धमाकेदार कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे.

'शैतान' चित्रपटाबद्दल :याशिवाय पहिल्या वीकेंडला 'शैतान' 50 कोटी रुपयांच्या जवळ पोहोचू शकतो, असे अनेकजण म्हणत आहेत. 'शैतान' हा गुजराती चित्रपट 'वश'चा हिंदी रिमेक आहे. काळ्या जादूवर आधारित या चित्रपटात माधवन वशिकरणाद्वारे अजय देवगणच्या मुलीवर संमोहित करतो. यानंतर अजय देवगण आपल्या मुलीच रक्षण करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. या चित्रपटातील सेन्सॉर बोर्डानं जवळपास 25 टक्के सीन्स कापले आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना घाम फुटला असता. 'शैतान'चं दिग्दर्शन विकास बहल यांनी केलं आहे. जिओ स्टुडिओ, देवगण फिल्म्स आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, 'शैतान'ची निर्मिती अजय देवगण, ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी केली आहे.

हेही वाचा :

  1. 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर बिग बॉस फेम यूट्यूबर एल्विश यादवविरुद्ध गुन्हा दाखल
  2. आलिया भट्टची 'लिटल वुमन' राहाने तिच्यासाठी महिला दिन बनवला आणखीन खास
  3. 'शैतान' एक्स रिव्ह्यू: अजय, आर माधवनच्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या का? घ्या जाणून मते...

ABOUT THE AUTHOR

...view details