मुंबई :चित्रपट निर्माते रतन जैन यांनी अलीकडेच 1993च्या ब्लॉकबस्टर बॉलिवूड थ्रिलर, 'बाजीगर'च्या बहुप्रतीक्षित सीक्वलबद्दलची माहिती शेअर केली आहे. शाहरुख खान स्टारर 'बाजीगर' हा बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. यात शाहरुख खान, काजोल आणि शिल्पा शेट्टी, दिलीप ताहिल, जॉनी लिव्हर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.'बाजीगर' 1993 मध्ये रिलीज झाला होता. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या सीक्वेलची मागणी करत आहेत. नुकतेच, निर्मात्यांनी यावर मौन सोडले आहे. एका मुलाखतीत, रतन जैन यांनी पुष्टी केली की, "बाजीगर 2 बद्दल चर्चा सध्या सुरू आहे.' विशेषत: या चित्रपटात शाहरुख खानच्या उपस्थितीबद्दल त्यांनी म्हटलं, 'बाजीगर 2 बद्दल आम्ही शाहरुखशी बोललो आहोत, आतापर्यंत या चित्रपटाबाबत काहीही झालेलं नाही."
'बाजीगर 2'ची झाली पुष्टी :आता 'बाजीगर 2'च्या पुष्टीमुळे शाहरुखचे चाहते खूप आनंदी आणि उत्साहित झाले आहेत. याशिवाय सीक्वलबद्दल बोलताना जैन यांनी पुढं सांगितलं, "शाहरुख खान पुन्हा त्याची भूमिका साकारण्यास राजी होईल, तेव्हाच हा सीक्वेल बनवला जाईल, कारण लोकांना हे पात्र खूप आवडले आहे आणि शाहरुखला या भूमिकेत पाहण्याची इच्छा सर्वांची आहे. जैन यांना शाहरुखला या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेसाठी कास्ट करायचे आहे. बाजीगरचे संवाद आजही लोकांच्या ओठावर आहेत. याशिवाय या चित्रपटामधील गाणी आजही आयकॉनिक आहेत.