मुंबई :बॉलिवूड स्टार शाहरुख खान 2 नोव्हेंबरला त्याचा 59वा वाढदिवस साजरा करणार आहे. शाहरुख खानच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आधीच सेलिब्रेशनचे वातावरण आता निर्माण केले आहे. वाढदिवसापूर्वी शाहरुख खान त्याच्या मुलाच्या कंपनीमधील एका कार्यक्रमासाठी कुटुंबासह दुबईला पोहोचला. या कार्यक्रमात शाहरुख खाननं कुटुंबाबरोबर स्टेजवर मनमोकळेपणाने एन्जॉय केला. दुबईतील या कार्यक्रमातील शाहरुख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो आपल्या सासूबरोबर डान्स करताना दिसत आहे. या कार्यक्रमात शाहरुख खानची सासू सविता छिब्बर, गौरी खान, आर्यन खान, सुहाना खान देखील उपस्थित आहेत.
शाहरुख खाननं केला धमाकेदार डान्स : शाहरुख खान दुबई इव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्टेजवर 'झूमे जो पठान'वर सासू सविता छिब्बरबरोबर हात धरून डान्स करताना दिसला. दरम्यान, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये शाहरुख खान मुलगी सुहाना खानबरोबर धमाल करताना दिसत आहे. दरम्यान शाहरुख खान आणि त्याचा सासूचा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. या व्हिडिओ अनेक चाहते आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. याशिवाय या कार्यक्रमात शाहरुखनं आपल्या अनेक चाहत्यांबरोबर देखील फोटो क्लिक केले आहेत. आता त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपट 'किंग'ची आतुरतेनं वाट पाहत आहेत.