मुंबई - Shahrukh Khan and Suhana Khan :बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान मुलगी सुहाना खानबरोबर रुपेरी पडद्यावर झळणार आहे. 'किंग' नावाच्या या चित्रपटासाठी वडील-मुलगी एकत्र काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. याचं शूटिंग सुरू करण्यासाठी आता एक मोठी योजना तयार केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'किंग खान' आणि त्याची मुलगी सुहाना यावर्षी जूनच्या सुरुवातीला या प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहेत. या चित्रपटामधील काही ॲक्शन सीक्वेन्स लंडनमध्ये शूट करण्यात येणार असल्याचं आता माहिती होत आहे. 'किंग' हा नक्कीच 'हाय-ऑक्टेन चेस सीक्वेन्स'सह एक रोमांचक सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना देईल.
शाहरुख खान आणि सुहाना खानचा अॅक्शन चित्रपट : 'किंग' या प्रोजेक्टवर सध्या काम सुरू आहे. याशिवाय या प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी प्राइम लोकेशन्स शोधलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'किंग'मध्ये शाहरुख हा डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती गौरी खान आणि सिद्धार्थ आनंदची जोडी करणार आहे. या चित्रपटाचं बजेट 200 कोटींहून जास्त असल्याचं बोललं जात आहे. 'किंग' हा शाहरुख आणि सुहानाचा पहिला चित्रपट असेल, ज्याची वाट आता अनेकजण पाहात आहेत. यापूर्वी किंग खाननं त्याचा मोठा मुलगा आर्यन खानला देखील लॉन्च केलं होतं. तो 'स्टारडम' नावाच्या त्याच्या पहिल्या दिग्दर्शकीय प्रोजेक्टवर काम करत आहे. याआधी आर्यनचे सेटवरील काही फोटो व्हायरल झाले होते.