मुंबई- Most Popular Film Stars in India : हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार शाहरुख खान आणि आलिया भट्ट 2024 या वर्षातील सर्वात लोकप्रिय स्टार्स म्हणून उदयास आले आहेत. ऑरमॅक्स मीडियाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालामधून हे जाहीर करण्यात आले आहे. लोकप्रिय कलाकारांच्या या यादीत ज्युनियर एनटीआर, अल्लू अर्जुन, राम चरण, रणबीर कपूर आणि महेश बाबू यांच्या नावाचाही समावेश आहे. भारतीय फिल्म इंडस्ट्रीचा समृद्ध वारसा पुढे जपण्याचे काम या कालाकारांकडून होत असल्याचे अहवालात म्हटलंय. या यादीमध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या महिला कालाकारांमध्ये नयनतारा, त्रिशा कृष्णन, कियारा अडवाणी, रश्मिका मंदान्ना आणि क्रिती सेनॉन यांचा समावेश आहे.
शाहरुख खानचे गेल्या वर्षी तीन ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाले. चार वर्षानंतर पुनरागमन केलेल्या शाहरुखने गेल्या वर्षीची सुरुवात त्याच्या हिट 'पठाण' चित्रपटाने केली. हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर त्याचा 'जवान' हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला आणि वर्षाच्या अखेरीस आलेल्या त्याचा 'डंकी' चित्रपटालाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोविडच्या काळात थिएटरपासून दुरावलेला प्रेक्षक पुन्हा परत आणण्याचे काम शाहरुखच्या या तिन्ही चित्रपटाने केले.
दाक्षिणात्य स्टार प्रभास आणि विजय थलपती यांनी शाहरुखच्या मागोमाग लोकप्रियाता मिळवली आहे. प्रभास स्टारर 'सालार - भाग 1 सीझफायर'ने डिसेंबरमध्ये बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले. या चित्रपटाने जगभरात सुमारे 700 कोटींची कमाई केली, तर विजय थलपतीच्या 'लिओ' चित्रपटाने 600 कोटींहून अधिक कमाई केली. यावेळी सलमान खान या यादीत पहिल्या पाचमध्ये पोहोचू शकला नाही आणि त्याला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील प्रभाव आणि लोकप्रियतेचे मोजमाप म्हणून गणल्या जाणाऱ्या या यादीत आलिया भट्ट अव्वल स्थानी राहिली आहे. विशेष म्हणजे सामंथा रुथ प्रभूने 'खुशी' चित्रपटानंतर काही काळ विश्रांती घेतल्यानंतरही ती दुसऱ्या स्थानावर अबाधित राहिली आहे. 'पठाण' आणि 'जवान'च्या यशामुळे दीपिका पदुकोणने तिसरी सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीचे स्थान पटकावले. कतरिना कैफ चौथ्या स्थानावर आहे. काजल अग्रवालपेक्षा ती थोडी पुढे आहे.
हेही वाचा -
- जान्हवी कपूरनं शिखर पहारिया, ऑरीसह अनवाणी पायानं चढल्या तिरपती बालाजीच्या पायऱ्या - Janhvi Kapoor Climbs remple Stairs
- ओटीटीवर सिक्वेल्सची रेलचेल, नव्या सीझनसाठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला - sequels on OTT
- श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर हॉरर कॉमेडी 'कपकपी'साठी पुन्हा एकदा एकत्र - Shreyas Reunites with Tusshar