मुंबई - Shah Rukh Khan 32 years bollywood :बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खान उद्या म्हणजेच 25 जून 2024 रोजी बॉलिवूडमध्ये 32 वर्षे पूर्ण करणार आहे. शाहरुख खानचा पहिला चित्रपट 'दीवाना' हा 25 जून 1992 रोजी रिलीज झाला होता. शाहरुखचा हिंदी चित्रपटसृष्टीतील तीन दशकांचा प्रवास खूपच सुंदर राहिला आहे. त्याला अनेकदा अपयशाला सामोरं जावं लागलं आहे. मागील अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर, शाहरुखनं 2023 मध्ये 'पठाण' या ॲक्शन चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर पुनरागमन केलं होतं. 'किंग खान'नं या 32 वर्षात अभिनेता म्हणून 76 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
शाहरुख खानचे आतापर्यंतचे चित्रपट : त्यानं 29 चित्रपटांमध्ये कॅमिओ केला आहेत. शाहरुख खाननं 75 पैकी 25 हून अधिक हिट चित्रपट दिले आहेत. यात त्याचा पहिला चित्रपट 'दीवाना' देखील आहे. 'दीवाना'नंतर शाहरुख खानच्या हिट लिस्टमध्ये 'बाजीगर', 'डर', 'करण अर्जुन', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कोयला', 'येस बॉस', 'देश', 'दिल तो पागल है', 'कुछ कुछ होता है', 'मोहब्बतें', 'कभी खुशी कभी गम', 'कल हो ना हो', 'डॉन', 'चक दे इंडिया', 'ओम शांती ओम', 'माय नेम इज खान', 'डॉन 2', 'चेन्नई एक्सप्रेस', 'हॅपी न्यू इयर', 'दिलवाले, पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या चित्रपटांचा समावेश आहे. शाहरुख खाननं ज्या चित्रपटांमध्ये कॅमिओ केला आहे त्यातील निम्म्याहून अधिक चित्रपट हिट झाले आहेत. यामध्ये सलमान खान स्टारर 'टायगर 3'चाही समावेश आहे.