महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'सरफिरा' आणि 'इंडियन 2' चित्रपटांना प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद, पाहा कमाईचे आकडे - SARFIRA AND INDIAN 2 - SARFIRA AND INDIAN 2

Sarfira and indian 2 box office day 2 : 'सरफिरा' आणि 'इंडियन 2' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आहेत. आता दोन्ही चित्रपटांच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

Sarfira and indian 2
सरफिरा आणि इंडियन 2 (Akshay Kumar and Kamal Haasan's Box Office Battles Continue (ANI/ETV Bharat))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 3:30 PM IST

मुंबई - Sarfira and indian 2 box office day 2 : कमल हसन स्टारर 'इंडियन 2' अक्षय कुमारचा 'सरफिरा' 12 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांमध्ये मोठी स्पर्धा आहे. 'इंडियन 2 आणि 'सरफिरा' हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या शैलीतील चित्रपट आहेत. या दोन्ही चित्रपटांना लोकांकडून संमिश्र प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत. आता चित्रपटांच्या दुसऱ्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा रिपोर्ट समोर आला आहेत. 'सरफिरा' आणि 'इंडियन 2'नं दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी किती कोटी रुपयांचा व्यवसाय केला याबद्दल जाणून घेऊया.

'सरफिरा' चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाची कमाई :अक्षय कुमार, राधिका मदन, परेश रावल स्टारर 'सरफिरा'ची कहाणी लोकांना खूप आवडली आहे. या चित्रपटाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 'सरफिरा' चित्रपटाचे दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केलंय. ''सराफिरा' चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचा कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, 'सरफिरा'नं पहिल्या दिवशी 2.40 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 4.25 कोटींची कमाई केली.

'इंडियन 2'च चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाची कमाई : कमल हासन, सिद्धार्थ आणि रकुल प्रीत यांचा 'इंडियन 2' हा चित्रपट तामिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट 1996 मध्ये आलेल्या 'हिंदुस्थानी' चित्रपटाचा सीक्वेल आहे. देशातून भ्रष्टाचार संपवण्याच्या मुद्द्यावर आधारित असलेल्या 'इंडियन 2'नं पहिल्या दिवशी 25.60 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी 'इंडियन 2'नं 16.7 कोटींचा व्यवसाय केला आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या तिसऱ्या दिवसात आहे. आज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार असं सध्या दिसत आहे.

हिंदुस्थानी 2 च्या दुसऱ्या दिवशी थिएटरमध्ये व्याप

मॉर्निंग शो: 36.44%

दुपारचा शो: 51.38%

संध्याकाळचे शो: 56.99%

ABOUT THE AUTHOR

...view details