मुंबई - Sara Ali Khan : हिंदी चित्रपटसृष्टीतील 'केदारनाथ गर्ल' सारा अली खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सारा अली खान तिच्या कामासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असते. ती बरेचदा तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी जात असते. तिनं देशातील अनेक मंदिरांना भेट दिली असून ती पुन्हा एकदा एका मंदिरात गेली आहे. यावेळी सारा अली खान महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी गेली आहे. आता साराचे याठिकाणावरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये सारा महादेवाच्या भक्तीत रमलेली दिसत आहे.
सारा अली खाननं घेतली महादेवाचं दर्शन :सारा अली खाननं तिच्या धार्मिक प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत. तिच्या या फोटोवर अनेकजण प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. एकीकडे 22 जानेवारीला रामनगरी अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमासाठी संपूर्ण बॉलिवूड जमले होते. तर साराने घृणेश्वरचरणी भक्तिभाव अर्पण केला. यावेळी सारा प्रिटेंड सूटमध्ये होती. तिनं तिच्या कपाळावर त्रिपुंड आणि डोक्यावर दुपट्टा घेतला होता. या लूकमध्ये ती सुंदर दिसत होती. सारा ही महादेवाची भक्त आहे. ती अनेकदा उज्जैनमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी जाताना दिसते.