मुंबई - Heeramandi Premiere :दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी 'हिरामंडी: द डायमंड बाजार' ही वेब सीरीज सध्या खूप चर्चेत आहे. या वेब सीरीजची वाट अनेकजण पाहात आहेत. दरम्यान रिलीजपूर्वी, निर्मात्यांनी मुंबईत 24 एप्रिल रोजी या वेब सीरीजच्या प्रीमियरचे आयोजन केले होते. वेब सीरीजच्या भव्य प्रीमियरसाठी अनेक बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटी एकाच छताखाली उपस्थित होते. रेड कार्पेटवर अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकार पापाराझीला फोटोसाठी पोझ देताना दिसले. आता या प्रीमियरमधील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
भन्साळी आणि सलमानचा फोटो व्हायरल : भन्साळी प्रॉडक्शननं 25 एप्रिल रोजी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्क्रिनिंगमधील काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, "ग्लिट्ज, ग्लॅमर आणि भव्यतेची शाही रात्र." फोटोमध्ये चित्रपट निर्माता भन्साळी काही कलाकारबरोबर दिसत आहे. याशिवाय त्याचा एक फोटो सलमान खानबरोबरचा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. दरम्यान 'भाईजान'नं भन्साळी यांच्या 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सीरीजच्या प्रीमियरला हजेरी लावली होती. आता अनेकांना हाच प्रश्न पडत आहे की, सलमान आणि भन्साळी यांच्यामधील वाद मिटला का? भन्साळी प्रॉडक्शननं सलमानच्या फोटोला महत्व दिल्यानंतर, या दोघांमधील वाद मिळाला असेल असा अनेकजण अंदाज लावत आहे.