महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा प्रोमो व्हायरल, सानिया मिर्झानं कपिल शर्माची उडवली खिल्ली... - sania mirza - SANIA MIRZA

Sania Mirza : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये सानिया मिर्झा, सायना नेहवाल, सिफ्त कौर सामरा आणि बॉक्सर मेरी कोम हे हजेरी लावणार आहेत. नेटफ्लिक्सनं या शोचा प्रोमो हा शेअर केला आहे.

Sania Mirza
सानिया मिर्झा (netflix - instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 11:28 AM IST

मुंबई - Sania Mirza : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या आगामी एपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या आठवड्यात कपिल शर्माच्या शोमध्ये क्रीडा जगतातील चार दिग्गज व्यक्ती हजेरी लावणार आहेत. टेनिसपटू सानिया मिर्झा, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, नेमबाज सिफ्त कौर सामरा आणि बॉक्सर मेरी कोम या शोमध्ये धमाल करताना दिसेल. प्रोमोमध्ये सायना, सानिया आणि मेरी या तिघीही आपल्या खास स्टाइलनं शोची शोभा वाढवत आहे. प्रोमोच्या सुरुवातीला कपिल शर्मा, सानिया, सायना, सिफ्त कौर आणि मेरी यांचं भव्य पद्धतीनं स्वागत करतो. यानंतर सुनील ग्रोव्हर येतो आणि म्हणतो, दोन-चार नायिका आल्या आहेत असं वाटतंय.

द ग्रेट इंडियन कपिल शो'चा प्रोमोव्हायरल :यानंतर कपिल म्हणतो की, "त्या हिरोईन नाही, स्पोर्ट्समधून आहे." तेव्हा सुनील म्हणतो की. "त्या देशाची नायिका आहेत." यानंतर कपिल म्हणतो, "मेरी तू पहिल्यांदाच आली आहेस. एक जोरदार पंच मारून दाखव." मेरी ही कॉमेडियन राजीव ठाकूर आणि कृष्णा अभिषेक यांना जोरदार पंच मारते. कपिल मेरीला विचारतो की, "बॉक्सर असलेल्या मुलींचे पती हे साधे असतात का ? ते खरच असतात की नंतर बनतात." यावर सानिया म्हणते की. "त्यांना व्हावेच लागते." सायना नेहवालनं सांगितलं की, तिची आई जर्मन टेनिसपटूची मोठी चाहती आहे. "मी दोन महिने बॅडमिंटन खेळले, त्यानंतर माझ्या आईनं सांगितलं की मला टेनिस खेळायला पाहिजे होतं. त्यात पैसा जास्त आहे." सायनाचं म्हणणं ऐकून सर्व हसू लागतात.

सानियानं दिलं कपिलला धाडसी पद्धतीनं उत्तर : कपिलनं सानियाला विचारले की, "तू एवढं सोनं जिंकलं आहेस तर जेव्हाही बाहेर जातेस तेव्हा दागिने विकत घेत नसशील." यावर सानिया म्हणते, "आम्ही फक्त सुवर्णपदक घालून जातो. तू वेडा आहेस का?" यानंतर कपिल म्हणतो, "तू माझी मोठी जावू तर नव्हती ना ?" नंतर ती हसते. मग सानिया गळ्यात स्कार्फ बांधते आणि कपिलसाठी ट्रेमध्ये चहा आणते. कपिल चहाचा घोट घेताच म्हणतो हा विषाप्रमाणे आहे. यानंतर सानिया म्हणते की "मी चहा बनवला होता. तुमच्या तोंडात विषबाधा झाली असेल." पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया पहिल्यांदाच शोमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये सानियानं सांगितलं की, ती लव इंटरेस्ट शोधात आहे. शोचा प्रोमो इतका मजेशीर आहे की संपूर्ण शो खूप धमाकेदार असेल असा अंदाज अनेकजण लावत आहे.

हेही वाचा :

  1. 'भूल भुलैया'मध्ये अक्षय कुमारनंतर सलमान खानची जागा घेऊ शकतो कार्तिक आर्यन - kartik aryan replaces salman khan
  2. 'कल्की 2898 एडी'च्या ट्रेलरसाठी काउंट डाऊन सुरू, सर्वांचं लक्ष यूट्यूब व्ह्यूजवर - KALKI 2898 AD
  3. बॉलिवूड अभिनेत्रींची प्रेग्नेंसीमधील स्टाईल - bollywood celebs

ABOUT THE AUTHOR

...view details