महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला साखरपुड्यानंतर चाहत्यानं केलं समांथा रुथ प्रभूला लग्नासाठी प्रपोज, व्हिडिओ व्हायरल - samantha ruth prabhu reaction - SAMANTHA RUTH PRABHU REACTION

Samantha Ruth Prabhu Marriage : अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे. आता यानंतर समांथा रुथ प्रभूला एका चाहतेनं लग्नासाठी प्रपोज केलंय.

Samantha Ruth Prabhu
समांथा रुथ प्रभू (समांथा रुथ प्रभू - instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 11, 2024, 12:13 PM IST

मुंबई - Samantha Ruth Prabhu Marriage : अभिनेत्री शोभिता धुलिपालाबरोबर नागा चैतन्यचा साखरपुडा होऊन अवघ्या काही दिवस झाले आहेत. समांथा रुथ प्रभूला आता एक लग्नाचा प्रस्ताव आला आहे. या प्रपोजलवर साऊथची क्यूट अभिनेत्री समांथानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिची प्रतिक्रिया येताच हा चाहता खुश झाला आहे . समांथा रुथ प्रभूच्या एका चाहत्यानं तिला अनोख्या पद्धतीनं लग्नासाठी प्रपोज केलंय. 'मुकेश चिंथा' नावाच्या एका चाहत्यानं इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हैदराबादमध्ये सामंथाचे घर शोधण्याचे नाटक करत असल्याचं व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलं आहे. समांथाला प्रपोज करण्यासाठी तो 'जिम'मध्ये गुडघ्यावर बसतो.

समांथाला चाहत्यानं केलं लग्नासाठी प्रपोज : मुकेशनं व्हिडिओची सुरुवात मजेशीर केली असून त्यान कॅप्शनमध्ये लिहिलं की, "मी समांथाला सांगण्यासाठी जात आहे की, तिला काळजी करण्याची गरज नाही, कारण मी तिच्यासाठी नेहमीच असेन." व्हिडिओमध्ये मुकेश समांथाच्या घरी पोहोचल्यानंतर, तो तिच्या 'जिम'मध्ये तिला शोधतो. यानंतर तो तिला त्याच्याबरोबर लग्न करण्याची विनंती करतो. तो म्हणतो की, "तुम्ही लग्नासाठी तयार असाल तर मी देखील तयार आहे." त्यानंतर तो समांथाला आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी दोन वर्षांचा वेळ मागतो. तो गुडघ्यावर बसतो आणि समांथाला लग्नासाठी प्रपोज करतो. व्हिडिओ शेअर करताना मुकेशनं लिहिलं की, "तुम्ही 100 टक्के अशा शॉट्सला चुकवता, ज्याला तुम्ही घेत नाही."

समांथानं दिला फॅनला रिप्लाय : मुकेशचा हा शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आता हा व्हिडिओ समांथानं देखील पाहाला आहे. तिनं या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं की, "पार्श्वभूमीतील जिममुळे, मी जवळजवळ कन्विंस झाली" त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर सामंथाची प्रतिक्रिया शेअर करताना मुकेशनं लिहिलं, "जर सामंथाचं 10 लाख चाहते असतील तर मी त्यापैकी एक आहे. जर सामंथाचा एकच चाहता असेल तर तो मी आहे. जर सामंथाचे चाहते नसतील तर याचा अर्थ मी आता पृथ्वीवर नाही. जर जग सामंथाच्या विरोधात असेल तर मी जगाच्या विरोधात असेल." दरम्यान समांथाचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यनं हैदराबादमध्ये वडील नागार्जुनच्या घरी शोभिता धुलिपालाबरोबर साखरपुडा केला. त्यानं आपल्या सोशल मीडियावर साखरपुड्यामधील फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा :

  1. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये कुस्तीपटू अमन सेहरावतनं जिंकलं कांस्यपदक, स्टार्सनं केला अभिनंदनाचा वर्षाव - AMAN SEHRAWAT
  2. वरुण धवन आणि सामंथा रुथ प्रभू स्टारर 'सिटाडेल हनी बनी'ची रिलीज डेट जाहीर - citadel release date out
  3. आदित्य रॉय कपूर ऐवजी रख्त ब्रम्हांडमध्ये सामंथा बरोबर झळकणार अलि फजल - Samantha Ruth Prabhu

ABOUT THE AUTHOR

...view details