महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सलमान खानच्या 'सिकंदर' शूटिंग सेटवरील व्हायरल फोटोमुळे चाहते संभ्रमात - Salman Khan - SALMAN KHAN

सलमान खानने त्याच्या बहुप्रतिक्षित 'सिकंदर' चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्याचं सांगितलं जातंय. खरंतर, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्येही हाच दावा केला जात असून यामुळे चाहते संभ्रमात पडले आहेत.

Salman Khan
सलमान खान (beingsalmankhan- Instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 10:15 AM IST

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे चर्चेत आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सलमान त्याच्या 'सिकंदर' या नवीन चित्रपटामुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. सलमान खानने 2024 च्या ईदला आपल्या चित्रपटाचे नाव घोषित केलं होतं आणि या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. आता 'सिकंदर'चा सेटवरील एक फोटो व्हायरल झाला आहे.

समीर नावाच्या एक्स हँडलवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल फोटोमध्ये समलान खान काळ्या टी-शर्ट आणि निळ्या डेनिममध्ये एका मुलीबरोबर दिसत आहे. या पोस्टमध्ये दावा केला जात आहे की, हा फोटो 'सिकंदर'च्या सेटवरील आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''मेगास्टार सलमान खान चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना 'सिकंदर'च्या सेटवर दिसत आहे.''

चाहत्यांना व्हायरल फोटोबद्दल संशय

हा व्हायरल फोटो पाहून सलमान खानचे चाहते संभ्रमात पडले आहेत आणि हा फोटो खरोखरच 'सिकंदर'च्या सेटवरील आहे का? असा प्रश्न करत आहेत. अनेकांनी याबद्दल शंका उपस्थित करताना हा फोटो 2020 मध्ये रिलीज झालेल्या 'राधे-मोस्ट वाँटेड' चित्रपटातील असल्याचं म्हटलंय. एका यूजरने लिहिले, हा फोटो जुनाच आहे, कारण भाईजानच्या खिशात सिगारेटचे डेव्हिडऑफ मॉडेल आहे, कारण त्यानं सिगारेटचा ब्रँड सध्या बदलला आहे.

'गजनी' फेम दिग्दर्शक एआर मुरुगोदास सिकंदरचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला आहेत. 2025 च्या ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खान हा वाय प्लस सिक्युरिटीमध्ये त्याच्या चित्रपटाची शूटिंग करणार असल्याचं बोललं जात आहे. इतकेच नाही तर सलमान जिथे जिथे या चित्रपटाचे शूटिंग करणार आहे तिथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सलमान खानची सुरक्षा टीम तो सेटवर पोहोचण्याच्या 10 दिवस आधी नजर ठेवण्यासाठी जाणार असल्याचं समजतं. सलमान, ज्या ठिकाणी जाईल त्याबद्दलची विशेष माहिती सुरक्षा काही अधिकाऱ्यांना असणार आहे.

हेही वाचा -

दिग्दर्शक संगीत सिवन यांचे 61 व्या वर्षी निधन, सेलेब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली - Sangeet Sivan passes away

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणाचं पुन्हा राजस्थान कनेक्शन, आरोपींना पैसे पुरविणाऱ्या आरोपीला अटक - salman khan house firing case

सलमान खान गोळीबार प्रकरण; तोपर्यंत अनुजचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, सीबीआय चौकशी करा: नातेवाईक आक्रमक - Salman Khan House Firing Case

ABOUT THE AUTHOR

...view details