मुंबई - Bigg Boss OTT 3 Salman Khan : हिंदी चित्रपटसृष्टीचा भाईजान सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय टीव्ही रिॲलिटी शो बिग बॉसची ओटीटी आवृत्ती आता पुन्हा चर्चेत आली आहे. बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीझन लवकरच सुरू होणार आहे. मात्र यावेळी 'भाईजान' हा शो होस्ट करताना दिसणार नाही. आता हा शो होस्ट करण्यासाठी बॉलिवूडचे तीन मोठे चेहरे पुढे येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, सलमान खान मोस्ट अवेटेड चित्रपट 'सिकंदर'च्या शूटिंगमुळे 'बिग बॉस ओटीटी 3' होस्ट करू शकणार नाही.
बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीझन : 'बिग बॉस ओटीटी 3' होस्ट करण्यासाठी चित्रपट निर्माते करण जोहर, अनिल कपूर आणि संजय दत्त यांची नावे आता समोर आली आहेत. या तीन स्टार्समध्ये करण जोहर हा शो होस्ट करण्याची सर्वाधिक शक्यता आहे. 'बिग बॉस ओटीटी सीझन 1' करण जोहरनं होस्ट केला होता. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनची विजेती दिव्या अग्रवाल होती. हा शो देखील प्रचंड लोकप्रिय झाला होता. यानंतर सलमान खाननं बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीझन होस्ट केला आणि नंतर वादग्रस्त यूट्यूबर एल्विश यादव हा शो जिंकला. बिग बॉसच्या इतिहासात वाइल्ड कार्ड एन्ट्रीनं बिग बॉस ट्रॉफी जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. यानंतर एल्विशच्या चाहत्यांमध्ये खूप वाढ झाली.