मुंबई - Salman Khan fan girl : बॉलिवूड अभिनेता सलमान खानवर हल्ल्याचा कट रचणाऱ्या 4आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हे आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील असल्याचं सांगण्यात येत आहे. आता पोलिसांनी दिल्लीतून एका फॅन गर्लला ताब्यात घेतलं आहे. जी सलमान खानच्या फार्महाऊसबाहेर फिरत होती. या मुलीला सलमानबरोबर लग्न करायचं असल्याचं सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वतःला सलमान खानची मोठी फॅन म्हणवणारी दिल्लीतील 24 वर्षीय तरुणी पनवेल तालुक्यातील त्याच्या फार्महाऊसबाहेर पोहोचली. तिनं सलमानला भेटण्याची मागणी केली होती.
24 वर्षीय तरुणीला सलमानबरोबर करायचं आहे लग्न :ही मुलगी सलमानची मोठी फॅन असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी मुलीला सोशल अँड इव्हेंजेलिकल असोसिएशन फॉर लव्ह (सील) नावाच्या एनजीओकडे नेले आहे. यानंतर तिला कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात मानसिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय तिच्या आईला दिल्लीहून बोलावण्यात आल्याचेही समोर येत आहे. सलमानशी लग्न करण्याच्या उद्देशानं ती मुलगी दिल्लीहून एकटीच मुंबईत आली होती, यानंतर तिचे घरचे खूप काळजीत होते. आठ दिवस उपचार आणि समुपदेशनानंतर या महिलेला घरी नेण्यात आलं आहे.