मुंबई - सलमान खान हा आजच्या काळातला एका मोठा सुपरस्टार्सपैकी एक आहे. आजही तो आपल्या लाखो चाहत्यांच्या हृदयांवर राज्य करतो. त्याच्या चाहता वर्गावरही त्याचं खूप प्रेम आहे. स्क्रिनवरील त्याची उपस्थिती आणि अभिनय यामुळं तर तो लोकांना आवडतोच पण त्याचं औदर्य आणि लोकांना मदत करण्याची वृत्ती यामुळंही तो प्रेक्षकांना आवडतो. याचं उदाहरण तेव्हा पाहायला मिळाले जेव्हा सलमान खाननं चित्रपटाच्या सेटवर काम करणाऱ्या कामगारांना 35 साड्या भेट म्हणून दिल्या होत्या. तर सांगायचं म्हणजे, उद्या म्हणजेच 27 डिसेंबरला सलमान खान त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करणार आहे. याआधी आपण या साड्या वाटपाची संपूर्ण कथा जाणून घेऊ.
कोणत्या चित्रपटाच्या सेटवर हे घडलं होतं?
2009 मध्ये सलमान खान प्रभू देवाच्या 'वॉन्टेड' या अॅक्शन फिल्मचं शूटिंग करत होता. दानशूरपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या सलमाननं पुन्हा एकदा आपला चांगुलपणा दाखवला. फिल्मसिटीमध्ये शूटिंगदरम्यान चार महिला सफाई कामगारांनी त्याच्याकडे साड्या मागितल्या. सलमाननं त्यांना किती महिला सफाई कामगार आहेत असं विचारले आणि लगेच एका माणसाला 35 साड्या घेण्यासाठी पाठवलं. नंतर त्यानं सर्व सफाई कामगारांना या साड्या भेट दिल्या.