महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सलमान खाननं बहीण अर्पिता खान शर्माचा वाढदिवस कथित गर्लफ्रेंट युलिया वंतूरबरोबर केला साजरा - Arpita Khan - ARPITA KHAN

Arpita Khan Sharma Birthday : सलमान खाननं काल रात्री 2 ऑगस्ट रोजी त्याची बहीण अर्पिता खान शर्माचा वाढदिवस साजरा केला. या कौटुंबिक सेलिब्रेशनमध्ये त्याची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरही दिसली.

Arpita Khan Sharma Birthday
अर्पिता खान शर्माचा वाढदिवस (सलमान खान (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 3:27 PM IST

मुंबई - Arpita Khan Sharma Birthday : अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बहीण अर्पिता खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सलमान खाननं देखील हजेरी लावली होती. एकीकडे 'बिग बॉस ओटीटी 3' शोच्या तिसऱ्या सीझनचा फिनाले सुरू होता, तर दुसरीकडे सलमान खान त्याची बहीण अर्पिता खान शर्माचा वाढदिवस हा कुटुंबीयांबरोबर साजरा करत होता. अर्पिता खान शर्मानं तिच्या वाढदिवसानिमित्त पती आयुष शर्माबरोबर एक पार्टी आयोजित केली होती. अर्पिता खानच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण खान कुटुंब एका छताखाली सेलिब्रेशन करताना दिसले.

सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माचा वाढदिवस :या पार्टीमध्ये सलमान खानची कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूर देखील दिसली. याशिवाय सलमान खानची आई आणि भाऊ सुहेल खान देखील केक कटिंगच्या वेळी एकाच फ्रेममध्ये कैद झाले आहेत. रितेश देशमुख त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा देखील या पार्टीमध्ये पोहचले होते. रितेश आणि जेनेलियानं सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची एक झलक शेअर केली आहे. या जोडप्यानं अर्पिता खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून अर्पिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. एका व्हिडिओत अर्पिता मुलगी आणि पतीसह वाढदिवसाचा केक कापत आहे.

अर्पिता खान शर्माचा वाढदिवस ((IMAGE- Ritiesh Deshmukh))

सलमान खानचे आगामी चित्रपट :केक कापल्यानंतर अर्पितानं पतीला आणि नंतर मोठा भाऊ सलमान खानला केक खाऊ घातला. व्हिडिओमध्ये सुहेल खान आणि युलिया हे दोघे देखील बोलताना दिसले. दरम्यान सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'टायगर 3' या चित्रपटामध्ये कतरिना कैफबरोबर दिसला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता पुढं तो 'पवनपुत्र भाईजान', 'द बुल', 'इन्शाअल्लाह', 'वॉन्टेड 2', 'नो एंट्री 2' , 'सिकंदर', 'किक 2', 'टायगर वर्सेस पठान' आणि 'दंबग 4'मध्ये दिसणार आहे.

अर्पिता खान शर्माचा वाढदिवस ((IMAGE- Genelia))

हेही वाचा :

  1. 'लॉरेन्स बिश्नोईला मला आणि माझ्या कुटुंबाला मारायचं होतं', सलमान खाननं केलं विधान... - SALMAN KHAN and Bishnoi Gang
  2. त्रिशा कृष्णन 14 वर्षांनंतर सलमान खानबरोबर 'द बुल'मधून बॉलिवूडमध्ये करणार कमबॅक - Trisha Krishnan News
  3. सलमान खान आणि शाहरुख खान यांनी अनंत - राधिकाच्या लग्नात नीता अंबानीबरोबर केला डान्स - Salman Khan and Shah Rukh Khan

ABOUT THE AUTHOR

...view details