महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांनी 200 बॅकग्राउंड डान्सर्ससह 'सिकंदर'मधील गाण्याचं केलं शूट - Salman Khan And Rashmika Mandanna - SALMAN KHAN AND RASHMIKA MANDANNA

Sikandar Movie : सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना त्यांच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. आता नुकतीच बातमी आली आहे की सलमान आणि रश्मिकानं एका गाण्यासाठी 200 डान्सर्सबरोबर शूट केलं.

Sikandar Movie
सिकंदर चित्रपट (सलमान खान - रश्मिका मंदान्ना (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2024, 5:03 PM IST

मुंबई - Sikandar Movie :अभिनेता सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'सिकंदर' या चित्रपटाची वाट अनेकजण आतुरतेनं पाहात आहेत. रिपोर्टनुसार सलमान आणि रश्मिकानं अलीकडेच 200 बॅकग्राउंड डान्सर्ससह एक गाणं शूट केलय. या गाण्याला संगीत प्रीतम यांनी दिलंय. ॲक्शन सीक्वेन्समधून ब्रेक घेत सलमान खाननं रश्मिका मंदान्नाबरोबर एक दमदार गाणं शूट केल्यानंतर तो पुन्हा चर्चेत आला आहे. हे गाणं गोरेगावच्या एसआरपीएफ ग्राउंडवर धारावीच्या झोपडपट्टीच्या सेटवर चित्रित करण्यात आलं. या गाण्यात झोपडपट्टीत राहणारे लोक सण साजरा करताना दाखवले आहेत.

चित्रपट कधी होणार प्रदर्शित : रश्मिका गुरुवारी चित्रपटाच्या युनिटमध्ये रुजू झाली आहे. या गाण्यात सलमान एका हटके अंदाजात दिसणार आहे. दुसरीकडे रश्मिका या गाण्यात पारंपरिक लूकमध्ये दिसेल, एआर मुरुगदासनं या गाण्याचं शूटिंग जवळपास पूर्ण केलं आहे. या वीकेंडपर्यंत काही ॲक्शन सीन शूट कले जातील. ऑगस्टपासून मुंबईत या चित्रपटाचे 45 दिवसांचे शेड्युल सुरू झाले आहे. तसंच मुंबईतील एका भागात मोठा स्टुडिओ देखील तयार करण्यात आल्याचं उघड झालं आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे.

वर्कफ्रंट : एआर मुरुगदास दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त सत्यराज, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर आणि काजल अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या हा चित्रपट खूप चर्चेत आहे. सलमानचा 'टायगर 3' हा 2023 मध्ये रिलीज झाला होता. यानंतर त्यानं शाहरुख खानच्या 'पठाण'मध्येही कॅमिओ केला होता. आत सलमान 'सिकंदर'मधून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यासाठी येत आहे. तसंच रश्मिकाबद्दल बोलायचं झालं तर ती रणबीर कपूर स्टारर 'ॲनिमल'मध्ये शेवटी दिसली होती. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. तिच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ती पुढं 'कुबेर', आणि 'छावा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. तब्बल सात वर्षांनी सलमाननं घेतली 'एक्स वहिनी' मलायकाची भेट, व्हिडिओ व्हायरल - Salman Khan met Malaika Arora
  2. गणपती विसर्जन सोहळ्यात सलमान खाननं कुटुंबासह केला धमाकेदार डान्स, व्हिडिओ व्हायरल - SALMAN KHAN
  3. दिग्दर्शक ॲटलीबरोबर सलमान खानच्या चित्रपटावर शिक्कामोर्तब? शूटिंगची तारीख आली समोर - action entertainer movie

ABOUT THE AUTHOR

...view details